बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडेने खूप कमी वेळेत बॉलिवूडमध्ये आपली एक वेगळी ओळख निर्माण केली. फॅन्स तिच्या लुक्सचे आणि स्टाईलचे दिवाने आहेत. परंतु, तुम्हाला माहिती आहे का, अभिनेत्री अनन्या पांडेची चुलत बहिण अलाना पांडे तिच्यापेक्षा हॉट आहे. अलाना पांडे हिने तिच्या बॉयफ्रेंडसोबत साखरपुडा केला आहे. (Alanna Panday Engagement) हा साखरपुडा खास ठरला आहे. अलानाने इन्स्टाग्रामवर तिला मिळालेल्या ड्रीमी प्रपोजलचे फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत. हे फोटोज पाहून वाटेल की, तुम्हाला देखील इतक्या रोमँटिक अंदाजात प्रपोज करावं. (Alanna Panday Engagement)
सोशल मीडिया सेंसेशन अलाना पांडेने रोमँटिक फोटो शेअर केले आहेत. तिचा बॉयफ्रेंड Ivor McCray ने तिला खूप रोमँटिक पध्दतीने लग्नासाठी प्रपोज केलं. याविषयी अलानाने इन्स्टावर मोठी पोस्ट लिहिली आहे.
Ivor McCray ला किस करतानाचा अलानाने फोटो शेअर केला आहे. कॅप्शनमध्ये तिने लिहिलंय की- आजपासून २ वर्षांपूर्वी मी हॅलोवीन पार्टीत या खास व्यक्तीला भेटले. त्यादिवशी त्याने मला इतकं हसवलं की, माझं तोंड दुखू लागलं होतं.
बाकी दुसऱ्या गोष्टी अस्पष्ट दिसतात. मला आठवतं की त्याने मला किती आनंद दिलाय. एकमेकांना ओळखल्यानंतर ३ महिने आम्ही एकत्र राहू लागलो. (मला माहित आहे, हे खूप लवकर होतं, पण, मी त्याच्याशिवाय, १ दिवस देखील वेगळं राहू शकत नाही.)
कदाचित हे यासाठी होतं की, त्याने मल परदेशात घरासारखं फील दिलं. तो जेव्हा माझ्या जवळ असतो, तेव्हा मला घराची आठवण येत नाही. घराची आठवण आल्यानंतर माझ्यासाठी भारतीय अन्न बनवण्यासाठी धन्यवाद. लो मोमेंटमध्ये मला हसवण्यासाठी धन्यवाद.
मला विना अट प्रेम करणं शिकवण्यासाठी आभार. तू माझा परफेक्ट अदर हाफ आहेस. माझं प्रेम तुझ्यासाठी प्रत्येक दिवस वाढत जातं. अलानाची ही पोस्ट व्हायरल होत आहेत. फॅन्स तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करताहेत.
अलानाने ड्रोनने कॅप्चर केलेला एक व्हिडिओदेखील शेअर केला आहे. यामध्ये समुद्र किनारी अलानाला तिच्या बॉयफ्रेंडने प्रपोज केलं आहे. समुद्र किनारी वाळूवर एक हार्ट बनवलं आहे. त्यावर मॅरी मी असं लिहिलं आहे. अलाना आपल्या बॉयफ्रेंडसाठी हगसाठी उभी आहे.
हा व्हिडिओ शेअर करताना अलानाने कॅप्शनमध्ये लिहिलंय- मी माझ्या बेस्ट फ्रेंडशी लग्न करत आहे. अलानाच्या या व्हिडिओवर तिच्या आईची प्रतिक्रिया देखील येत आहे. तिने लिहिलंय- परमेश्वरा दोघांना खुश ठेवो. Ivor McCray चा फॅमिलीत स्वागत आहे.
अलानाचे सोशल मीडियावर नेहमीचं हॉट अवतारात दिसते. तिचे इन्स्टाग्रामवर फॅन फॉलोईंगदेखील चांगले आहे. ती आपले ग्लॅमरस फोटोज इन्स्टावर शेअर करत असते. नेहमी तिचे नवे नवे फोटोशूट व्हायरल होतात. ग्लॅमरस फोटोंमध्ये तिचा सेंसेशनल अवतार पाहून फॅन्स भरभरून कमेंट करत असतात.
अलाना अभिनेता चंकी पांडे यांचा भाऊ सेलेब्रिटी फिटनेस एक्सपर्ट डॅने पांडे यांची मुलगी आहे. ती एक ट्रॅव्हल एन्थुजियास्ट आहे आणि लंडनमधील कॉलेजमधून आपले पदवीपर्यंतचे शिक्षण घेतेले आहे. इन्स्टाग्रामवर अलानाला 851k फॉलोअर्स आहेत.
(सर्व फोटो alannapanday insta वरून साभार)