नोटबंदी निर्णयाला पाच वर्षे पूर्ण; आम्ही आता कोणत्या चौकात यावे?, नवाब मलिकांचा सवाल | पुढारी

नोटबंदी निर्णयाला पाच वर्षे पूर्ण; आम्ही आता कोणत्या चौकात यावे?, नवाब मलिकांचा सवाल

मुंबई : पुढारी ऑनलाईन डेस्क

नोटबंदीला पाच वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर मंत्री नवाब मलिक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अनेक सवाल केले आहेत. नोटबंदीमुळे देशात बेरोजगारी वाढली. अर्थव्यवस्थेचा कणा मोडल्याचा दावा मलिक यांनी केला. नोटबंदीमुळे देशातून आंतकवाद, काळा पैसा संपला का? असे सवाल त्यांनी केलेत.

नोटबंदी नंतर रांगेत उभे राहून अनेक लोकांचा जीव गेला. शेतकऱ्यांचे नुकसान झाले. अर्थव्यवस्था कोलमडल्याचे मलिक यांनी म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ नोव्हेंबर २०१६ रोजी नोटबंदीची घोषणा केली होती. चलनातून ५०० आणि १ हजार रुपयांच्या नोटा बाद केल्या. पंतप्रधान मोदी यांनी नोटबंदी करत असल्याची जेव्हा घोषणा केली होती त्या भाषणात मोदींनी माझा हेतू चुकीचा वाटला तर मी चौकात उभा राहीन. देश जी शिक्षा करेल ती मी भोगेन, असे म्हटले होते. या पंतप्रधानांच्या घोषणेचा उल्लेख करत मलिक यांनी कुठे आहे तो चौक? असा सवाल केला.

BJP Meeting : “भाजप हा एका कुटुंबाभोवती चालणारा पक्ष नाही” : पंतप्रधान

नोटबंदीमुळे काळा पैसा काही परत आला नाही. तसेच भ्रष्टाचारदेखील कमी झाला नाही. मोदीजी तुम्ही ३ महिने मागितले होते. आता त्यांनी सांगावे की आम्ही कोणत्या चौकात यावे, असेही त्यांनी म्हटले आहे.

समीर वानखेडे यांच्यावर पुन्हा निशाणा…

दरम्यान, नवाब मलिक यांनी ड्रग्ज प्रकरणी एक ट्विट करुन समीर वानखेडे यांच्यावर निशाणा साधलाय. ”समीर दाऊद वानखेडे, तुमची मेहुणी हर्षदा दीनानाथ रेडकर हिचा ड्रग्जच्या व्यवसायात सहभाग आहे का? तुम्ही यावर उत्तर द्यायला हवे कारण तिची केस पुणे कोर्टात प्रलंबित आहे. हा पुरावा आहे.” असे ट्विट मलिक यांनी केले आहे.

हे ही वाचा :

Back to top button