Nysa Devgan 
Latest

Nysa Devgan : न्यासाची ख्रिसमस पार्टी; ‘ओव्हर अँक्टिंग करण्याची गरज आहे का.?’… (video)

अनुराधा कोरवी

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेता अजय देवगन आणि काजोल यांची मुलगी न्यासा देवगन ( Nysa Devgan ) स्टार किड असल्याने कायमच चर्चेत असते. न्यासा नुकतेच मित्रासोबत ख्रिसमस पार्टीत स्पॉट झाली परंतु, कॅमेऱ्यासमोरचा तिचा नखरा आकर्षणाचा केंद्रबिदू ठरला. यानंतर चाहत्यांनी तिच्या व्हिडिओवर कमेन्टसचा पाऊस पाडलाय.

ख्रिसमस पार्टीचे औत्सुक्य साधत न्यासा देवगन( Nysa Devgan) तिच्या मित्रासोबत मुंबईतील रेस्टारंटच्या बाहेर स्पॉट झाली. यावेळी तिच्यावर पापाराझीच्या कॅमेऱ्याची नजर खिळली. यावेळी ती तिचा बॉयफ्रेंड वेदांत महाजन यांच्या हातात- हात खालून फिरताना दिसली. या पार्टीत ती ऑरी, सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम अली खान आणि अर्जुन रामपालची मुलगी माहिका रामपालसोबत दिसली आहे.

न्यासावर पिंक रंगाचा वनपीस खूपच खुलून दिसत होता. परंतु, यावेळी खास करून कॅमेऱ्याला पोझ देताना न्यासा पहिल्यांदा घाबरते. त्यामुळे बॉयफ्रेड पॉपाराझी कॅमेऱ्याच्या समोर येत होता. शिवाय तिला फोटोला पोझ देताना तिला मागे खेचत होता. यामुळे तिला 'ओव्हर अॅक्टींग करण्याची गरज आहे का…?' असे म्हटले आहे. हा व्हिडिओ विरल भयानी इंन्स्टाग्रामवर व्हायरल झाला आहे.

न्यासाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच चाहत्यांनी तिच्यावर कौतुकाचा वर्षाव करत कमेन्टसचा पाऊस पडला आहे. यात एका युजर्सने 'ओव्हर अॅक्टिंग करण्याची गरज आहे का…?', 'ये इतनी गोरी कब हो गई ?', 'Ibhrahim Ali Khan is so cute and handsome ?❤', 'सर्जरी केली आहेस का?', 'I really dont understand…in logon ko ab kuch dino mein films mein aana hi rehta, fir usse pehle paps ek smile diya toh kya jata…natak kyu…', 'arey let the kids be…kya media wale itna pateshan kr dete hai …privacy ni bachti yar'. यासारख्या अनेक कमेन्टस केल्या आहेत.

तर काही नेटकऱ्यांनी हार्ट आणि फायरच्या ईमोजींनी कमेन्टस सेक्शन बॉक्स भरला आहे. या व्हिडिओला आतापर्यत ६० हजारांहून अधिक जणांनी लाईक्स केले आहेत.

हेही वाचलंत का? 

(video ; viralbhayani instagram वरून साभार)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT