Tiger Cubs Death : ‘ली’ पुन्हा मातृसुखाला मुकली; दोन्ही बछड्यांचा मृत्यू | पुढारी

Tiger Cubs Death : 'ली' पुन्हा मातृसुखाला मुकली; दोन्ही बछड्यांचा मृत्यू

नागपूर; पुढारी वृत्तसेवायापूर्वी तीन वेळी मातृत्वाची अनुभूती आली. पण, तिन्ही वेळेला नियतीने डाव साधला. यावेळी सारेच आनंदात असताना. नैसर्गिक प्रसुती झाली, दोन बछड्यांना जन्म दिला. पण, यावेळीही त्यांनी जगाचा आणि मातेचा निरोप घेतला. (Tiger Cubs Death) ही व्यथा आहे, नागपुरातील गोरेवाड्यातील ली वाघिणीची. प्रशासनाने आवश्यक खबरदारी घेतली गेली. पण, सारे व्यर्थ. प्राणिसंग्रहालयाचे संचालक शतानिक भागवत, पशुवैद्यक डॉ. मयूर पावशे, अभिरक्षक दीपक सावंत, सहायक वनसंरक्षक सारिका खोत, सहाय्यक वनसंरक्षक माडभूशी यांची धडपड निरर्थक ठरली. महाराष्ट्र पशुवैद्यकीय विद्यापीठाचे प्रमूख आणि वन्यजीव संशोधन आणि प्रशिक्षण केंद्राचे संचालक डॉ. शिरीश उपाध्ये यांना आमंत्रित करण्यात आले होते.

Tiger Cubs Death : दोन्ही बछड्यांचा मृत्यू

बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतराष्ट्रीय प्राणिसंग्रहालयातील ’ली’ वाघिणीला शनिवारी प्रसव वेदना सुरू झाल्या. यापूर्वी प्रसूतीनंतर लगेच शावकांना तोंडात दाबून मारण्याचा इतिहास लक्षात घेता पिल्लांना तातडीने वेगळे करून पिल्लांच्या कृत्रिम संगोपनासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली होती. सारेजण लक्ष ठेवून होते. पहिल्याच्या मानेला तोंडात धरल्याने जखम झाली नंतर तिने दुसऱ्या पिल्लाला जन्मही दिला.  ठरल्याप्रमाणे ‘ली’ला तातडीने पिलापासून वेगळे करण्यात आले. पण, ते मृत होते. आनंदाच्या सोहळ्यावर दुःखाची चादर पसरली.
2009 साली वाघिणीपासून दुरावलेले तीन बछडे महाराजबाग प्राणिसंग्रहालयात आणले गेले. त्यांना ली, जान आणि चेरी अशी नावे दिली गेली. महाराजबागेतच साहेबराव वाघापासून ती पहिल्यांदा गर्भवती राहिली होती. त्यानंतर ली आणि साहेबराव गोरेवाड्यात दाखल झाले.
हेही वाचा

Back to top button