एअर इंडिया पुन्हा एकदा टाटांकडे गेली. याची घोषणा होताच ट्विटरवर वेगळ्या वेगवेगळ्या प्रकारची चर्चा सुरू झाली. आता देशात कोणतीही सरकारी विमान सेवा नाही, तेव्हा मंत्रालय आणि मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्याकडे काय काम शिल्लक आहे? सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रकारचे मीम्स व्हायरल हेऊ लागल्या. हवाई वाहतूक मंत्रालयाकडे खरोखरच विमान सेवा चालवण्याशिवाय काही काम आहे का आणि ज्योतिरादित्य सिंधिया यांच्याकडे काही काम राहील नाही का? सरकारी विमान कंपनी विकल्यानंतरही हवाई वाहतूक मंत्रालय काय करते. या चर्चा सगळीकडे सुरु झाल्या.
पण अस काही नाही या मंत्रालयाकडे अजुन बरच काम आहे. विमान तळांपासून ते विमानांपर्यंत पूर्ण कंट्रोल या मंत्रालयाचे असते. DGCA- (Directorate general of civil avition ), BCAS- (Bureau of Civil Aviation Security), AAI- (AIRPORTS AUTHORITY OF INDIA), AERAI- (Airport Economic Regulatory Authority of India) पवनहंस हेलिकॉप्टर, हे सर्व विभाग या मंत्रालयाकडून चालवले जातात.
सेफ्टी, हवा पाणी चेक करते, त्यांची ही जबाबदारी आहे. विमानांसाठी नियम, कायदे बनवायचे, विमान उड्डाण घेण्यास तयार आहे का हे पाहण्याचे काम या विभागाचे आहे. एअर कंट्रोलर्स, अपघात झाला तर त्याची चौकशी हा विभागच करते.
ICAO शिकागो कन्व्हेन्शनच्या अनुबंध 17 नुसार विमानतळ ऑपरेटर, एअरलाइन ऑपरेटर आणि एव्हीएसईसी उपायांचे पालन करण्यासाठी जबाबदार असलेल्या त्यांच्या सुरक्षा एजन्सीजसाठी विमान सुरक्षा मानके तयार करणे.
सुरक्षा नियम आणि नियमांचे पालन करणे आणि सुरक्षा आवश्यकतांचे सर्वेक्षण करणे.
सुरक्षा नियंत्रणाचे पालन करणारे व्यक्ती पूर्णपणे प्रशिक्षित आहेत आणि त्यांची कर्तव्ये पार पाडण्यासाठी सर्व आवश्यक क्षमता आहेत याची खात्री करणे.
विमान सुरक्षा मानकांचे नियोजन आणि समन्वय.
सुरक्षा कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता आणि सतर्कता तपासण्यासाठी अचानक तपासणी करणे.
आकस्मिक योजनांची पर्याप्तता आणि विविध एजन्सींच्या ऑपरेशनल तयारीची चाचणी करण्यासाठी मॉक एक्सरसाइज आयोजित करणे.
एअरपोर्ट चे काम पाहणे, पॅसेंजर टर्मिनल कसे असणार, वेटींग कुठे असणार, आत येण्याच्या बाहेर जाण्याचे मार्ग ठरवणे.
सीआरएस, रेल्वे इन्स्पेक्टर- कोणत्याही मार्गावर रेल्वे चालणार असेल तर या विभागाच हिरवा झेंडा गरजेचा असतो. हा विभाग रेल्वेची पटरी तयार केलेली असते ती तपासण्याच काम हा विभाग करतो. चेक अँड बॅलन्ससाठी या विभागाकडे हे काम देण्यात येतं.
ही सरकारी हेलिकॉप्टर सर्विस आहे. पवनहंस चे एकुण ४३ हेलिकॉप्टर्स आहेत. हे हेलिकॉप्टर्स वैयक्तिक भाड्याने दिले जाते.
विमान तळावरील खर्चाचा हिशोब ठेवणे. एअरपोर्ट वरील खर्चाचा हिशोब ठेवणे, कीती चार्ज घेतला पाहीजे याचा हिशोब केंद्राला सादर करतात.
जरी एअर इंडिया टाटांनी विकत घेतली असली तरी हवाई वाहतूक मंत्रालयाकडे अजुनही बरीच काम आहेत.