BMW C 400 GT : भारतात लाँच झालेल्या सर्वात महागड्या स्कूटरची किंमत माहीत आहे का? | पुढारी

BMW C 400 GT : भारतात लाँच झालेल्या सर्वात महागड्या स्कूटरची किंमत माहीत आहे का?

पुढारी ऑनलाईन डेस्क

बीएमडब्ल्यु मोटर्रेड इंडियाने नवी कोरी BMW C 400 GT ही मिड साईज मॅक्सी स्कूटर भारतात लाँच केली आहे. C 400 GT ही संपूर्णपणे विदेशात तयार झालेली ही स्कूटर भारतात आयात केली जाणार आहे. ही स्कूटर तुम्ही बीएमडब्ल्यु मोटर्रेड इंडियाच्या डिलरककरवी आजपासून बुक करु शकता असे बीएमडब्ल्युकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या वक्तव्यात सांगण्यात आले आहे. ही मिडसाईज प्रीमियम स्कूटर आरमदायी, तुमचा प्रवास सुखकर करण्यासाठी आणि गतीशील कामगिरीसाठी डिझाईन केलेली आहे.

मात्र ही स्कूटर बुक करण्यापूर्वी तुम्ही तिच्या भारतातील किमतीवर एकदा नजर टाकावी. कारण ही गाडी घेताना तुमचा खिसा किंवा बँक अकाऊंट चांगलेच रिकामे होणार आहे. C 400 GT ची एक्स शोरूम किंमत ही ९.९५ लाखापासून सुरु होते. ही अल्पाईन व्हाईट रंगात उपलब्ध आहे. तर स्टाईल ट्रिपल ब्लॅक रंगातही ही स्कूटर उपलब्ध आहे. मात्र या रंगातील स्कूटरची एक्स शोरूम किंमत ही १० लाख १५ हजार इतकी आहे.

बीएमडब्ल्यु ग्रुप इंडियाचे अध्यक्ष विक्रम पावाह यांनी सांगितले की, ‘BMW C 400 GT भारतात लाँच झाल्याने शहरतील स्कूटर सेगमेंटमध्ये नवीन युग सुरु करेल. ही आधुनिक आणि चपळ मिड साईज स्कूटर शहर आणि लांबच्या प्रवासासाठी एक उत्तम पर्याय आहे. तुम्ही मुख्य शहरात, ऑफिसला किंवा विकेन्डला दूरच्या प्रवासाला जाणार असाल तर C 400 GT हा तुमचा योग्य पार्टनर आहे. तुम्ही एकटे असा की सहप्रवाशासोबत BMW C 400 GT तुमचा उत्तम पार्टनर आहे.’

BMW C 400 GT मध्ये आहे दमदार इंजिन

C 400 GT मध्ये ३५० सीसीचे दमदार सिंगल सिलेंड, वॉटर कूल फोर स्ट्रोक इंजिन आहे. हे इंजिन ३३.५ बीएचपी ७५०० आरपीएम जनरेट करते. याचा सर्वोच्च टॉर्क हा ५७५० आरपीएमला ३५ एमएम इतका आहे. ही स्कूटर ० ते १०० किमी वेग फक्त ९.५ सेकंदात गाठते. या स्कूटरचा उच्च वेग हा १३९ किलोमिटर प्रतितास इतका आहे. C 400 GT स्कूटरमध्ये डायरेक्ट इंटिग्रेटेड सीव्हीटी गिअर बॉक्स बसवण्यात आला आहे.

स्कूटरची पुढची बाजू ही एरोडायनामिक्स लक्षात घेऊन डिझाईन केलेली आहे. याला ट्विंन एलईडी लाईट देण्यात आले आहेत. याचबरोबर एलईडी डे टाईम रनिंग लाईटचेही वेगळे डिझाईन देण्यात आले आहे. याचे इंटिग्रेटेड टर्निंग लाईट हे विशेष आकर्ष आहे. याचबरोबर हाय विंडशिल्ड वाऱ्यापासून रक्षण करण्यासाठी देण्यात आली आहे. याचा लाँग ड्राईव्हसाठी चांगला उपयोग होऊ शकतो.

याचबरोबर BMW C 400 GT मध्ये ६.५ इंचाची पूर्ण कलर टीएटी स्क्रीन देण्यात आली आहे. यामध्ये कनेक्टिव्हिटी फंक्शन, याचबरोबर बीएमडब्ल्यु मोटर्रेड कनेक्टिव्हिट अॅप देखील देण्यात आले आहे. याचबरोबर ग्राहकांना कस्टमाईज बीएमडब्ल्यु अॅक्सेसरिजही यात अॅड करता येतील.

Back to top button