नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा
'अग्निपथ' योजनेविरोधात विविध संघटनांनी पुकारलेल्या भारत बंदच्या ( Agnipath Yojana Protest ) पार्श्वभूमीवर दिल्ली राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात सोमवारी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. ठिकठिकाणी करण्यात आलेले बॅरिकेडिंग आणि पोलिस तपासणी मोहिमेमुळे दिल्ली – एनसीआरमधील वाहतूक कोलमडून गेली.
दिल्लीला लागून असलेल्या नोएडा, गुरुग्राम, फरिदाबाद, गाझियाबाद सहित इतर सीमांवर सकाळपासून वाहनांच्या प्रचंड रांगा लागल्या होत्या. अग्निपथ योजनेविरोधात अनेक संघटनांनी 'चलो दिल्ली' चा नारा दिला होता. यामुळे पोलीस आणि तपास संस्थानी सुरक्षेच्या अनुषंगाने विशेष दक्षता घेतली होती. बॅरिकेडिंगमुळे दिल्लीच्या सीमांवर तसेच शहरात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. कार्यालय गाठण्याच्या धावपळीत असलेल्या चाकरमान्यांना याचा त्रास सोसावा लागला.
भारत बंदच्या पार्श्वभूमीवर केवळ दिल्लीच नव्हे तर देशाच्या विविध भागात सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली होती. बिहारमध्ये पाटणा येथील डाक बंगला चौराहा, पंजाबमधील अमृतसर रेल्वे स्थानक या ठिकाणांवर खास लक्ष ठेवण्यात आले होते.
हेही वाचा :