विधान परिषद निवडणूक : शिवसेनेची रणनिती; मतदानासाठी आमदारांचे गट | पुढारी

विधान परिषद निवडणूक : शिवसेनेची रणनिती; मतदानासाठी आमदारांचे गट

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : विधान परिषदेच्या दहा जागांसाठी सोमवार दि. 20 जून रोजी मतदान होत असून राज्यसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीची या निवडणुकीत कसोटी लागली आहे. 10 जागांसाठी 11 उमेदवार रिंगणात आहेत.

शिवसेनेची रणनिती 

विधान परिषद निवडणुकीसाठी शिवसेना आमदार मतदान करण्यापूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या दालनात जमले. त्यांचे विभागवार गट केले आहे.  कोकणातील आमदारांचा गट प्रथम मतदानाला गेला आहे. मुख्यमंत्री हे आमदारांना भेटत नाहीत, म्हणून नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचे समर्थक, आमदार नाराज असल्याची कुजबूज शिवसेनेमध्ये  होती. आज शिंदे सेनेच्या आमदारांसह विधान भवनात आले. पण या निवडणुकीची सर्व सूत्रे मुख्यमंत्र्यांनी स्वतःच्या हातात घेतली आहेत. आमदारांना ते मार्गदर्शन करत आहेत. तसेच परिवहनमंत्री अनिल परब यांच्याकडून आमदारांना सूचना केल्या जात  आहेत.

हेही वाचा

Back to top button