Latest

BJP national executive meet : भाजप कार्यकारिणीची आज बैठक

backup backup

विविध राज्यांतील आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आज (दि. ७) दिल्लीत भारतीय जनता पक्षाची कार्यकारिणीची बैठक (BJP national executive meet) पार पडणार आहे. या बैठकीत पाच राज्यांतील विधानसभा आणि संघटनात्मक बांधणीवर चर्चा होण्याची शक्यता आहे. या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांची प्रमुख उपस्थित असेल, अशी माहिती सांगितले दिली.

BJP national executive meet : राष्ट्रीय कार्यकारिणीचे १२४ सदस्य उपस्थित राहणार

कोरोनानंतर प्रथमच आयोजित करण्यात आलेली  ही बैठक 'हायब्रिड' पद्धतीने हाेईल. या वेळी काही सदस्य वैयक्तिकरित्या उपस्थित राहणार आहेत. तर काही सदस्य व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठकीत सहभागी होतील. माध्यमांसमोर आलेल्या माहितीनुसार पंतप्रधान नरेंद्र  मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यासह भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे १२४ सदस्य उपस्थित राहणार आहेत.

राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या भाषणाने बैठकीची सुरुवात होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी  हेही यावेळी मार्गदर्शन करणार आहेत.  राष्ट्रीय विषयांवर आणि अजेंड्यावर सदस्य चर्चा करण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर 'आत्मनिर्भर भारत' कार्यक्रमाचे सादरीकरणही या वेळी  करण्यात येणार आहे. या बैठकीत किमान एक राजकीय ठराव मंजूर होण्याची शक्यता आहे, अशी माहिती भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस अरुण सिंह यांनी दिली.

हेही वाचलं का? 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT