देसी जुगाड… बाईक वर बसवली नऊ माणसं! | पुढारी

देसी जुगाड... बाईक वर बसवली नऊ माणसं!

नवी दिल्लीः

सोशल मिडियात अनेक वेळा भन्नाट व्हिडिओ येत असतात. आता एका अनोख्या ‘बाईक’च्या व्हिडिओने लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे. एरवी बाईकवरून दोन व्यक्ती प्रवास करीत असताना दिसून येतात. मात्र या बाईकवर तब्बल नऊ माणसं बसलेली दिसून येतात. हा ‘देसी जुगाड’ पाहून लोक थक्क होत होते.

मध्यप्रदेशमधील एक आमदार जयवर्धन सिंह यांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये दिसते की एक व्यक्ती मोटारबाईकवरून जात असून त्यावर लाकडाची बाके लावलेली आहेत. या बाकांवर काही महिला आरामात बसलेल्या दिसून येतात. ग्रामीण भागात बरेच जण एकाच बाईकवरून प्रवास करीत असतात. मात्र असा ‘जुगाड’ कुणी पाहिला नसेल. या बाईकवरून पाच महिला आणि चार मुलं प्रवास करीत होती. बाईक चालवणार्‍या माणसाचे संतुलन साधण्याचे कौशल्यही अफलातून होते. मात्र वाहतूकीच्या कोणत्याही नियमात न बसणारे कृत्य तो करीत होता. त्याने हेल्मेटही परिधान केलेले नव्हते. हा व्हिडिओ पाहून अनेक लोक थक्क झाले.

Back to top button