Latest

Rajeshwari Kharat : राजेश्वरी काय होतीस तू काय झालीस तू ?…

अनुराधा कोरवी

पुढारी ऑनलाईन डेस्क : दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या 'फँड्री' चित्रपटातील शालूच्या भूमिकेने अभिनेत्री राजेश्वरी खरात  (Rajeshwari Kharat ) घराघरात पोहोचली आहे. यानंतर आता ती बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमठवत आहे. तर याच दरम्यान ती मॉडर्न लूकमध्ये पाहायला मिळतेय.

शालू फेम अभिनेत्री राजेश्वरी खरात गेल्या काही दिवसांपुर्वी एका वेगळ्याच कारणांने चर्चेत आली आहे. राजेश्वरी बॉलिवूडमध्ये पहिल्यांदा पदार्पण करत असून नुकतेच तिच्या आगामी चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. 'पुणे टू गोवा' या बॉलिवूड चित्रपटातून आपल्या अभिनयाचा ठसा उमठवणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अमोल भगत करत आहेत. हा चित्रपट कॉमेडी असून यात थ्रिलर आणि सस्पेन्स पाहायला मिळणार आहे.

हा चित्रपट 'पुणे टू गोवा' या प्रवासावर आधारीत आहे. शालूच्या आगामी चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहात आहेत. राजेश्वरीने आपल्या सहज सुंदर अभिनयाने फॅन्ड्री चित्रपटाच उत्कृष्ट काम केले आहे. या चित्रपटात तिचा एकही डॉयलॉग नाही. परंतु, तिचा अभिनय आजही चाहत्यांच्या मनात घर करत आहे. या चित्रपटात तिने एका शाळकरी मुलगी (शालू) ची भूमिका साकारली आहे. 'फँड्री' चित्रपटात साधी दिसणारी शालू प्रत्यक्षात मात्र, ग्लॅमरस आणि मॉडर्न अंदाजात दिसतेय.

अभिनेत्री राजेश्वरीने (Rajeshwari Kharat ) नुकतेच तिच्या इंन्स्टाग्रामवर नवनवीन मॉडर्न लूकमधील काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोत ती ब्लॅक रंगाच्या शार्ट ड्रेसमध्ये हटके अंदाजात दिसत आहे. यावेळी तिने एका कारच्या शिटवर बसून हटके पोझ दिली आहे. यातील खास म्हणजे, तिच्या मोकळ्या कुरळ्या केसांसह मेकअपने तिच्या सौदर्यांत चारचॉद लावले आहेत. राजेश्वरीच्या या फोटोंनी चाहत्यांना घायाळ केले आहे.

हे फोटो सोशल मीडियावर शेअर होताच चाहत्यांनी आपआपल्या प्रतिक्रिया देताना कॉमेन्टस दिल्या आहेत. यात एका युजर्सने 'खूप खूप छान❤️❤️', 'काळी चिमणी', '????एकदम भारी दिसतेस', '? नुसता धूर', 'अरं जब्याची काळी चिमणी कुठ गावल लका', 'काळी चीमनीची सोय करावीच लागेल ?', 'खुपच भारी बरं का……?', 'एक नंबर ❤️???❤️', 'लय भारी ????', 'काय होतीस तू काय झालीस तू?' , 'जीव घायाळ होतो ग???', 'दिलखेचक????', 'आग आहेस आग?❤️?', 'कडक माल', 'So sweet Beautiful, Glowing', 'Ufff???', 'Osm??❤️'. यासारख्या अनेक प्रतिक्रियांनी कॉमेन्टस बॉक्स भरलेला आहे.

तर याच दरम्यान एका युजर्सने राजेश्वरीला लवकर लग्न करण्याचा सल्लादेखील दिला आहे. याशिवाय अनेक चाहत्यांनी भरभरून हार्ट आणि फायरचे ईमोजी शेअर केले आहेत. राजेश्वरी नेहमी सोशल मीडियावर सक्रिय असून आपले हॉट फोटो शेअर करत असते. राजेश्वरीने याआधी 'फँड्री', 'आयटमगिरी' या मराठी चित्रपटांत अभिनय केला आहे.

हेही वाचलंत का? 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT