चला शिकूया चिझी, टेस्टी पिझ्झा; दै. ‘पुढारी’ कस्तुरी क्लबतर्फे उद्या वर्कशॉप | पुढारी

चला शिकूया चिझी, टेस्टी पिझ्झा; दै. ‘पुढारी’ कस्तुरी क्लबतर्फे उद्या वर्कशॉप

कोल्हापूर : पिझ्झा, बर्गरसारखे पदार्थ हे मुलांच्या आवडीचेच आहेत. असे पदार्थ बाहेर जाऊन खाण्यापेक्षा घरच्या घरी मुलांना बनवून दिले तर मुले खूश होतील आणि मुलांबरोबरच मोठ्यांनाही त्याचा आस्वाद घेता येईल. बर्‍याचदा पिझ्झा बेस नीट होत नाही किंवा त्याचा सॉस किंवा टॉपिंग नीट जमत नाही; पण अशा सर्वच शंका दूर करण्यासाठी आणि सेम टू सेम पिझ्झा शॉपसारखा पिझ्झा घरच्या घरी बनविण्यासाठी दै. ‘पुढारी’ कस्तुरी क्लबमार्फत पिझ्झा बनविण्याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या वर्कशॉपमध्ये पिझ्झा बेसपासून पिझ्झा सॉससह पिझ्झाचे अनेक प्रकार शिकवले जाणार आहेत.

दि.17 मे रोजी दुपारी 2 वाजता हॉटेल गोविंदपूरम, खरी कॉर्नर येथे वर्कशॉप घेण्यात येणार आहे. यात रेड पिझ्झा सॉस, स्पिनॅच सॉस, व्हाईट पिझ्झा सॉस, क्रिमी मश्रुम सॉस, हवाईन पिझ्झा, पनीर पिझ्झा, कबाब पिझ्झा, डिलक्स व्हेजी पिझ्झा, पनीर टिक्का पिझ्झा, चिझी कॉर्न पिझ्झा, मार्गरिटा पिझ्झा, फार्महाऊस पिझ्झा, पनीर मखनी पिझ्झा, फ्रेश व्हेजी पिझ्झा, चॉकलेट पिझ्झा, चीझ बस्ट पिझ्झा, मेक्सिकाना पिझ्झा इ. पिझ्झाचे प्रकार शिकविले जाणार आहेत. पदार्थांच्या प्रिंटेड नोटस् देण्यात येणार आहेत. याच बरोबर यासंबंधीचे व्यवसाय मार्गदर्शनही या वर्कशॉपमध्ये केले जाणार आहे.

कार्यशाळेसाठी कस्तुरी क्लब सदस्यांना फक्त 300 रुपये, तर इतर महिलांना 500 रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे. कार्यशाळेसाठी पूर्व नावनोंदणी करणे आवश्यक आहे. इच्छुकांनी खालील क्रमांकांवर संपर्क साधावा- 8483926989 किंवा 9096853977.

Back to top button