Latest

Katrina kaif : कॅटलाही कोरोना! IIFA मध्ये न जाण्याचं कारण आलं पुढं

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क

अक्षय कुमार, कार्तिक आर्यन आणि आदित्य रॉय कपूरनंतर आता अभिनेत्री कॅटरिना कैफही (Katrina kaif) या कोरोनाच्या विळख्यात आली आहे. हिंदी चित्रपटसृष्टीत पुन्हा एकदा कोरोना झपाट्याने पसरत आहे. अक्षय कुमार, कार्तिक आर्यन आणि आदित्य रॉय कपूरनंतर आता अभिनेत्री कॅटरिना कैफही या विषाणूच्या विळख्यात आली आहे. (Katrina kaif )

कॅटरिना विजय सेतुपतीसोबत श्रीराम राघवन दिग्दर्शित मेरी ख्रिसमसच्या शूटिंगला सुरुवात करणार होती. पण त्याआधीच ती कोरोना पॉझिटिव्ह आली. यामुळेच ती पती विकी कौशलसोबत IIFA २०२२ मध्ये दिसली नाही. या पुरस्कार सोहळ्यात विकीने सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा आयफा पुरस्कार पटकावलाय.

२५ मे रोजी मुंबईतील यशराज स्टुडिओमध्ये झालेल्या करण जोहरच्या ग्रँड बर्थडे पार्टीत सहभागी झालेले ५० ते ५५ सेलिब्रिटी कोरोनाच्या विळख्यात आल्याचे वृत्त आहे. या पार्टीत आदित्य रॉय कपूर आणि कतरिना कैफ होते. कार्तिक आर्यनला त्याच्या एका महिला सहकलाकारामुळे कोरोनाची लागण झाल्याचे म्हटले जात आहे. ही नायिका करणच्या पार्टीचा भाग होती. सध्या हे सर्व कलाकार त्यांच्या घरी क्वारंटाईन झाले आहेत.

करण जोहरच्या पार्टीत येणाऱ्या आणखीही अनेक टॉप लेव्हल सेलिब्रिटींना कोरोनाची लागण झाल्याचे म्हटले जात आहे. मात्र, करणच्या पार्टीत सहभागी झालेल्या एकाही कलाकाराने याला दुजोरा दिलेला नाही.

हेदेखील वाचा-

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT