Time Traveler  
Latest

Time Traveler : एलियनबद्दल टाइम ट्रॅव्हलरच्या दाव्यामुळे उडाली मोठी खळबळ

Arun Patil

पॅरिस : परग्रहावर अतिप्रगत मानव आहे काय, या प्रश्नाचे उत्तर शास्त्रज्ञांना अजूनही सापडलेले नाही. यांनाच एलियन असे संबोधले जाते. ते खरोखरच अस्तित्वात आहेत का? असतील तर ते मानवाच्या संपर्कात आहेत का? या प्रश्नांची ठोस उत्तरे मिळालेली नसली तरी वैज्ञानिक सातत्याने एलियन्सशी संपर्क साधण्यासाठी संशोधन करत आहेत. त्यातच आता एका टाइम ट्रॅव्हलरने (Time Traveler) एलियन्सबाबत केलेल्या दाव्यामुळे खळबळ उडाली आहे.

2023 मध्ये एलियन्स आणि पृथ्वीवरील लोकांमध्ये युद्ध होईल, असा दावा टाइम ट्रॅव्हलरने (Time Traveler) केला आहे. या टाईम ट्रॅव्हलरने भविष्यातील 2869 सालातून परत आल्याचा दावा केला आहे. 2023 मध्ये एलियन आणि मानव यांच्यात युद्ध होईल. समुद्रात आश्चर्यकारक शोध लागतील. यासोबतच भयानक भूकंपही येईल. एलियन आणि मानव यांच्यातील हे युद्ध

पृथ्वीपासून अंतराळातदेखील होणार असल्याचा दावा या टाइम ट्रॅव्हलरने (Time Traveler) केला आहे. त्याने टिकटॉकवर व्हिडीओ शेअर करत हे दावे केले आहेत. 2023 च्या अखेरीस पृथ्वीवरील लोकांना अनेक नैसर्गिक आपत्तींना सामोरे जावे लागेल असा इशाराही त्याने दिला आहे. हे दावे करणार्‍या टाईम ट्रॅव्हलरचे टिकटॉकवर प्रोफाइलसुद्धा आहे. एलियन्स आपल्या दिशेने येत आहेत. एलियन आणि मानव यांच्यात अंतराळ युद्ध सुरू होणार आहे. 18 मार्च 2023 रोजी अलास्का येथे भूकंप होईल. भयंकर आपत्ती येईल.

26 जून 2023 पॅसिफिक महासागरात ब्लू व्हेलपेक्षा मोठा प्राणी सापडेल. हा प्राणी 350 फूट लांब असेल. 1 ऑक्टोबर 2023 रोजी गोलोथ नावाची एक प्रजाती दिसेल आणि ती मानवापेक्षा कितीतरी जास्त बुद्धिमान असेल असे दावे या टाइम ट्रॅव्हरले केले आहेत. टाइम ट्रॅव्हल म्हणजे भविष्यात किंवा भूतकाळात डोकावणे. अनेक जण आपण आपण टाईम ट्रॅव्हलर (Time Traveler) असल्याचा दावा करतात. त्यापैकीच हा एकजण आहे. या पूर्वी देखील अनेक टाईम ट्रॅव्हलरनी एलयनशी संपर्क झाल्याचा दावा केला आहे.

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT