अब्दुल सत्तार यांनी उधळलेल्या स्तुतिसुमनांना महत्त्व देत नाही : खा. शरद पवार यांचे विधान | पुढारी

अब्दुल सत्तार यांनी उधळलेल्या स्तुतिसुमनांना महत्त्व देत नाही : खा. शरद पवार यांचे विधान

बारामती : कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी बारामतीत येत कृषी प्रदर्शन पाहिल्यानंतर पवार कुटुंबीयांवर स्तुतिसुमने उधळली. यासंबंधी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना विचारणा केली असता ते म्हणाले, त्याला फार काही महत्त्व मी महत्त्व देऊ इच्छित नाही.
बारामतीतील कृषी प्रदर्शनाला पवार यांनी रविवारी (दि. 22) भेट दिली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

रविवारी पवार यांना सत्तार यांनी केलेल्या कौतुकाबद्दल विचारले असता ते म्हणाले, मी त्याला फार महत्त्व देत नाही. प्रकाश आंबेडकर हे सेनेसोबत युती करू इच्छितात. पण काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत सहभागी व्हायचे की नाही हे पुढचे पुढे बघू म्हणतात. या प्रश्नावर पवार म्हणाले, मला यासंबंधी काही माहिती नाही. मी या भानगडीत पडत नाही.

संबंधित बातम्या
Back to top button