आमदार लक्ष्मण जगताप यांचे बंधू शंकर जगताप यांच्या पिंपरी चिंचवडमध्ये कार्यालयावर अज्ञातांनी रॉकेल बॉम्ब टाकल्याने शहरात एकच खळबळ उडाली. ही घटना दुपारी तीनच्या सुमारास पिंपळे गुरव येथे उघडकीस आली.
पोलीस उपायुक्त आनंद भोईटे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपळे गुरव येथे आमदार लक्ष्मण जगताप यांचे बंधू शंकर जगताप यांचे कार्यालय आहे. दरम्यान, दुपारी तीनच्या सुमारास दुचाकीवर आलेल्या तीन अज्ञात इसमांनी कार्यालयाच्या दिशेने दोन रॉकेल बॉम्ब फेकले. त्यामुळे आग लागली होती. मात्र, उपस्थितांनी प्रसंगावधान राखून आग विझवली. त्यामुळे मोठी हानी टळली.
पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहेत. यातील एका फुटेजमध्ये आरोपी स्पष्टपणे कैद झाले असून त्यांचा शोध सुरू आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांसह शहरातील उच्चपदस्थ पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली.
पिंपरी चिंचवडमध्ये रॉकेल बॉम्ब : काचेच्या बाटलीमध्ये रॉकेल भरून त्याची वात पेटवली जाते. त्यानंतर बाटली फेकल्यानंतर बाटली फुटून रॉकेल सांडते व मोठा भडका होतो. रॉकेल बॉम्बमुळे मोठी आग लागण्याची शक्यता असते. आंदोलनकर्त्यांनी यापूर्वी राज्यात अनेक ठिकाणी रॉकेल बॉम्बचा वापर केल्याचे समोर आले आहे.
हेही वाचा :