st staff strike विलीनीकरण शक्य नसेल तर…;शरद पवारांनी दिला ‘हा’ सल्ला | पुढारी

st staff strike विलीनीकरण शक्य नसेल तर...;शरद पवारांनी दिला ‘हा’ सल्ला

मुंबई, पुढारी ऑनलाईन

एसटी कर्मचाऱ्यांच्या  st staff strike मागण्यांबाबत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्यात चर्चा झाली असून पवार यांनी याबाबत तोडगा सुचविला आहे. जर एस टी महामंडळाचे सरकारमध्ये विलीनीकरण करता येणे शक्य नसेल तर कर्मचाऱ्यांची पगारवाढ करा, त्यासाठी तरतूद करा, अशी सूचना पवार यांनी केली आहे.

पवारांची ही सूचना परब यांनी गांभीर्याने ऐकून घेत त्यादृष्टीने पावले टाकण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान एसटी कर्मचाऱ्यांसोबत आझाद मैदानात आंदोलनाला बसलेले भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर हे परब यांच्या भेटीसाठी गेले आहेत. पडळकर हे शिष्टमंडळासह सह्याद्री अथितीगृहावर बैठकीत सहभागी होणार आहे. एसटी महामंडळाचे सरकारमध्ये विलीनीकरण या एकाच मुद्द्यावर आपण चर्चा करणार आहे. त्याशिवाय आम्ही कुठलीही चर्चा करणार नाही, असे पडळकर म्हणाले.

एसटी कर्मचारी आपल्या विविध मागण्यांसाठी संपावर st staff strike गेल्याने राज्यभरातील वाहतूक ठप्प झाली आहे. या आंदोलनात भाजपचे अनेक नेते सहभागी झाल्याने त्याला राजकीय स्वरुपही आले आहे. एसटी महामंडळाचे सरकारमध्ये विलीनीकरण हा एकच मुद्दा कर्मचाऱ्यांनी लावून धरल्याने सरकारी कोंडी झाली आहे. परिवहन मंत्री अनिल परब यांनी अनेक पर्याय ठेवून तसेच विलीनीकरणाबाबत हायकोर्टाने समिती नेमूनही कर्मचारी संघटना मागे हटलेल्या नाहीत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आजारी असल्याने ते हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. त्यामुळे परब यांनी पवार यांच्याशी चर्चा केली. या चर्चेवेळी खासदार संजय राऊत, उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. यावेळी विविध विषयांवर चर्चा झाली. विलीनीकरणाबाबत पवार यांना माहिती देण्यात आली. सद्यस्थितीत विलीनीकरणाची प्रक्रिया शक्य नसल्याचे परब यांनी काही तथ्यांच्या आधारे सांगितले. त्यानंतर पवार यांनी विलीनीकरण शक्य नसेल तर कर्मचाऱ्यांचे पगार वाढवा, अशी सूचना केली.

गुजरात, मध्यप्रदेशमधील सार्वजनिक वाहतूक क्षेत्रातील कर्मचाऱ्यांचे पगार चांगले असल्याचे सांगितले. कर्नाटक आणि महाराष्ट्रात पगार कमी असल्याने तेथे असंतोष आहे, यावरही चर्चा झाली.

एसटीच्या संपावर st staff strike लवकरच तोडगा निघेल, असा विश्वास संजय राऊत यांनी या भेटीनंतर व्यक्त केला. ‘एसटीच्या कामगारांबद्दल सर्वांनाच सहानुभूती आहे. कामगारांचं समाधान करण्याचे सर्व प्रयत्न सरकार करत आहे. आज पवार यांच्यासोबत झालेल्या बैठकीत मला असं समजलं की, पवार साहेबांनी परिवहन मंत्र्यांना काही सकारात्मक सूचना दिल्या आहेत. एसटी संपाच्या आगीत तेल ओतण्याचं काम सुरू आहे. ते कोण आणि का करतंय? महाराष्ट्रातलं वातावरण कोण आणि का भडकवतंय हे सर्वांना माहीत आहे,’ असा हल्लाबोलही राऊत यांनी केला.

हेही वाचा : 

Back to top button