Kaun Banega Crorepati
Kaun Banega Crorepati

Kaun Banega Crorepati : स्पर्धकाच्या बोलण्याने चक्क अमिताभ बच्चन लाजले!

Published on

पुढारी ऑनलाईन डेस्क : कौन बनेगा करोडपती ( Kaun Banega Crorepati ) सीझन १४ मध्ये प्रत्येक आठवड्यात नवनवीन स्पर्धक त्यांचे नशीब आजमावत असतात. या शोमधून काहींचे स्वप्न पुर्ण होते. तर काहींना हार पत्करून माघारी फिरावे लागते. मात्र, जास्त करून अमिताभ बच्चन यांच्यासमोर हॉट सीटवर बसणे हे प्रत्येक स्पर्धकासाठी एक खास संधी असते. कालच्या भागात हॉट सीटवर बसण्याची संधी नागपूरचे रहिवासी अनिकेत शंकर पाटील यांना मिळाली. परंतु, या शोत अनिकेत यांनी सांगितलेल्या एका गोष्टीमुळे चक्क अभिताभ बच्चन लाजले आहेत.

कौन बनेगा करोडपतीच्या ( Kaun Banega Crorepati ) १४ व्या सीझनमध्ये अमिताभ बच्चन यांनी अनिकेत यांना ८० हजार रूपयांसाठी 'हिंदू देवतांपैकी कोणत्या देवाकडे उसाचे धनुष्य आणि फुलांचे बाण होते?' हा प्रश्न विचारण्यात आला. यानंतर त्याने मित्राचा शेवटचा लाईफलाईन व्हिडिओ कॉल घेतला. मात्र, त्याला योग्य उत्तर मिळाले नाही. यामुळे अनिकेत यांनी चुकीचे उत्तर दिले आणि तो ८० हजार रुपयांवरून १० हजारांवर मागे आला. या प्रश्नाचं योग्य उत्तर कामदेव असे होते.

याच दरम्यान शोच्या सुरूवातीला अनिकेत शंकर पाटील म्हणाले की, 'मी अमिताभ बच्चन यांना पाहिलं आणि मला खूपच आनंद झाला. तुमच्या समोर हॉट सीटवर बसण्याची संधी मिळाली यासाठी मी आभार मानतो. चित्रपटातील ज्या- ज्या भूमिका तुम्ही साकारल्या आहेत त्या सर्व फारच रंजक आहेत. तुमच्या ताकदीची बरोबरी दुसरी कोणीही करू शकत नाही. मी तुमच्या वयाबद्दल बोलत नाही.' असेही ते यावेळी म्हणतात. यानंतर मात्र, अमिताभ बच्चन चक्क लाजतात.

अनिकेतनंतर अमिताभ बच्चन याच्यासमोर हॉट सीटवर बसण्याची संधी पंजाबच्या रहिवासी आरती बजाज यांना मिळाली. त्या एक वरिष्ठ बँक व्यवस्थापक आहेत. या दरम्यान अमिताभ बच्चन यांनी कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांना श्रद्धांजली वाहिली. यात त्यांनी 'आणखी एक सहकारी, मित्र आणि सर्जनशील कलाकार आम्हाला सोडून गेला. अचानक आजार आला आणि तो वेळेपूर्वी निघून गेला.' असे पोस्टमध्ये लिहिलेय.

हेही वाचलंत का? 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news