गुजरात मध्ये संपूर्ण मंत्रिमंडळ नवे; जुन्या मंत्र्यांना घरचा रस्ता

गुजरात मध्ये संपूर्ण मंत्रिमंडळ नवे; जुन्या मंत्र्यांना घरचा रस्ता
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : गुजरात मध्ये विजय रुपाणी यांच्याजागी नियुक्त केलेल्या भूपेंद्र पटेल यांच्या मंत्रिमंडळ विस्तारात  सर्व नवे मंत्री सहभागी झाले आहेत. रुपाणी मंत्रिमंडळातील सर्व मंत्र्यांना घरचा रस्ता दाखविला आहे.

भूपेंद्र पटेल यांचा बुधवारी शपथविधी होणार होता. मात्र, नव्या चेहऱ्यांच्या समावेशावरून पक्षात प्रचंड नाराजी निर्माण झाली होती. रुपाणी समर्थक आमदारांनी त्यांच्या निवासस्थानी गर्दी केली होती.
गुजरात मुख्यमंत्री कार्यालयातून दिलेल्या माहितीनुसार आज सायंकाळी साडेचार वाजता गांधीनगर येथे कॅबिनेट बैठक होणार आहे.

हे आहेत नवे मंत्री

  • राजेंद्र त्रिवेदी
  • जितेंद्र वघानी
  • ऋषिकेश पटेल
  • पूर्णश कुमार मोदी
  • राघव पटेल
  • उदय सिंह चव्हाण
  • मोहनलाल देसाई
  • किरीट राणा
  • गणेश पटेल
  • प्रदीप परमार
  • हर्ष सांघवी
  • जगदीश ईश्वर
  • बृजेश मेरजा
  • जीतू चौधरी
  • मनीषा वकील
  • मुकेश पटेल
  • निमिषा बेन
  • अरविंद रैयाणी
  • कुबेर ढिंडोर
  • कीर्ति वाघेला
  • गजेंद्र सिंह परमार
  • राघव मकवाणा
  • विनोद मरोडिया
  • देवा भाई मालव

निमा आचार्य विधानसभा अध्यक्ष

गुजरात विधानसभा अध्यक्षपदी निमा आचार्य यांची निवड केली आहे. राजेंद्र त्रिवेदी यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यांना मंत्री बनविण्यात आले आहे.

रुपाणी यांना सक्तीने विश्रांती?

गुजरातमध्ये पुढील वर्षी निवडणुका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर गुजरातमध्ये कार्यक्षम मंत्रिमंडळ असणे, ते मोदी आणि शहा यांच्या विचारांचे असणे या गोष्टींना प्राधान्य दिल्याचे समजते. नेहमीप्रमाणे शहा यांनी धक्कातंत्र अवलंबत संपूर्ण मंत्रिमंडळच घरी बसविले आहे. नवे मंत्रिमंडळ देण्यामागे नेमकी कारणे काय? याबाबतही तर्कवितर्क लढविले आहेत. उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांच्यासारख्या वजनदार नेत्यालाही घरी बसविल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.  नवे गुजरात मंत्रिमंडळ आल्याने त्यांना दृश्य स्वरुपात रिझल्ट देणे गरजेचे आहे.

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news