पुणे : भाजपच्या नगरसेवकाचा राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश - पुढारी

पुणे : भाजपच्या नगरसेवकाचा राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश

पिंपरी; पुढारी वृत्तसेवा : भाजप आघाडीचे गटनेते व थेरगावचे नगरसेवक कैलास उर्फ बाबा बारणे यांनी आज गुरूवारी (दि, ९) मुंबई येथे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश केला.

पिंपरी- चिंचवड महापालिकेची निवडणूक ६ महिन्यांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे राजकीय समीकरणे बदलत आहेत. सत्ताधारी भाजपला गळती लागली आहे. विरोधात असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपला धक्का देत १ नगरसेवक आपल्या पक्षात घेतला आहे.

भाजप संलग्न असलेले अपक्ष आघाडीचे गटनेते व थेरगावचे नगरसेवक कैलास उर्फ बाबा बारणे यांनी आज मुंबई येथे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश केला. हा भाजपला मोठा धक्का मानला जात आहे.

यापुर्वी भाजपच्या नगरसेविकेचे पती राजू लोखंडे व संतोष बारणे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता.

हेही वाचलंत का? 

पाहा : धनंजय महाडिक यांच्या घरचा गणेशोत्सव 

Back to top button