

बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग कश्यप (Aliyah Kashyap) यांची मुलगी आलिया कश्यप खूप बोल्ड आहे. सोशल मीडियावर ती नेहमी ॲक्टिव्ह असते. ती तिच्या ग्लॅमरस फोटोंवरून अनेकदा चर्चेतदेखील आलीय. आता तिचे बॉयफ्रेंडसोबतचे बेडरूममधील फोटो व्हायरल झाले आहेत. विशेष म्हणजे, फोटोंमध्ये दोघे बेडवर दिसत आहेत. आलिया कश्यप (Aliyah Kashyap) तिच्या बॉयफ्रेंडसोबत टॉवेल गाऊनमध्ये दिसत आहे.
व्हायरल झालेल्या फोटोंमध्ये ती हॉटेलमध्ये तिच्या बॉयफ्रेंडसोबत बेडवर बसलेली दिसत आहे. दोघंही एकमेकांना किस करताना दिसत आहेत. आलिया आणि तिच्या बॉयफ्रेंडचे लिपलॉक फोटो व्हायरल झाले आहेत. यामध्ये दोघेही खूप रोमँटिक दिसत आहेत.
आलियाचे स्वतःचे एक यूट्यूब चॅनलदेखील आहे. ती इन्स्टाग्रामवरदेखील ॲक्टिव्ह असते. आलिया मुळातचं बोल्ड आहे.
ती तिच्या बॉयफ्रेंडसोबतचे फोटो नेहमीचं पोस्ट करत असते. यामध्ये रोमँटिक आणि बोल्ड फोटोंचाही समावेश असतो. यावर्षी ऑगस्टमध्ये आलियाने बॉयफ्रेंड शेनचा वाढदिवस साजरा केला होता. यानिमित्त तिने एक लांबलचक नोट लिहिली होती.
आलियाने लिहिलं होतं, '२२ व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा माय लव्ह. तू मला जगातील सगळ्यात नशीबवान मुलगी आहेस अशी जाणीव करुन देतोस. तुला मिळवून मी भाग्यवान आहे आई लव्ह यू फॉरेवर.'