Kolhapur Accident कागल : वाघजाई घाटात चालत्या कारचा स्फोट; चालकाचा होरपळून मृत्यू | पुढारी

Kolhapur Accident कागल : वाघजाई घाटात चालत्या कारचा स्फोट; चालकाचा होरपळून मृत्यू

भडगाव; पुढारी वृतसेवा : कागल मुरगुड रस्त्यावर व्हणाळी (ता. कागल, जि. कोल्हापूर) जवळील वाघजाई घाटात चालत्या कारचा स्फोट झाला. (Kolhapur Accident ) त्यानंतर गाडी जळत जळत सुमारे दोनशे मीटर खोल दरीत जाऊन पडली. त्यामध्ये गाडी चालकाचा होरपळून मृत्यू झाला.

आज शुक्रवारी सकाळी अभिजित हणमंत धनवडे (वय ३१, रा. कणेरी) हे आपली गाडी क्रमांक MH 09 AQ 3703 मधून प्रवास करत असताना अचानक गाडीचा स्फोट झाला. त्यानंतर पेट घेतलेली गाडी जळत जळत सुमारे दोनशे मीटर खोल दरीत जाऊन पडली. यामध्ये धनवडे यांचा जागीच होरपळून मृत्यू झाला. गाडी दरीत पडल्यानंतर परिसरातील गवतालाही आग लागली.

या घटनेची माहिती गोरंबेचे माजी सरपंच शिवाजी पाटील गोरंबे यांनी कागल पोलिसांना दिली. त्यानंतर या आपघाताची वर्दी मिळताच कागल पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आणि अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. कागल पोलीस ठाण्याचे स. पो. नि. संजय गोर्ले हे अपघाताची माहिती घत असता, गाडी घाटात गेल्यानंतर दोन स्फोट झाल्याचे प्रत्यक्षदर्शी लोकांनी पोलिसांना सांगितले. या घटनेचा पुढील तपास कागल पोलीस करत असून, हा अपघात आहे की घातपात याबाबत उपस्थितांत चर्चा सुरू होती.

हे ही वाचा :

 पहा व्हिडिओ : कागल : वाघजाई घाटात चालत्या कारचा स्फोट

Back to top button