Ranbir-Alia Wedding : मुहूर्त ठरला! लग्न ते हनीमूनपर्यंत यादी ठरली

alia bhatt and ranbir kapoor
alia bhatt and ranbir kapoor
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क

बॉलीवूड अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्ट (Ranbir Alia Wedding ) सध्या त्यांच्या लग्नावरून चर्चेत आले आहेत. लग्नावरून दोघांच्या दीर्घकाळ चर्चा होत राहिल्या आहेत. मात्र, अखेर मुहूर्त ठरलाय. सूत्रांच्या माहितीनुसार, रणबीर-आलिया एप्रिलमध्ये लग्नाच्या बंधनात अडकू शकतात. लग्नाआधी रणबीर कपूर शानदार बॅचलर पार्टीदेखील देणार असल्याचे समजते. (Ranbir Alia Wedding )

रिपोर्टनुसार, दोघांच्या लग्नाची जोरदार तयारी सुरू आहे. प्री-वेडिंग फंक्शन ते लग्नाच्या आऊटफिटपर्यंत तयारी झाली आहे. रणबीर कपूर-आलिया भट्ट वा कपूर फॅमिलीकडून आतापर्यंत लग्नाविषयीच्या वृत्ताला दुजोरा दिलेला नाही.

लग्नाआधी रणबीर कपूर देणार बॅचलर पार्टी

रणबीर कपूर लग्नाआधी आपल्या जवळच्या मित्रमंडळींना आणि इंडस्ट्रीतील लोकांना एक दमदार बॅचलर पार्टी देणार आहे. या बॅचलर पार्टीमध्ये अयान मुखर्जी, आदित्य रॉय कपूर आणि अर्जुन कपूर सहभागी होऊ शकतात.

या दिवशी प्री-वेडिंग फंक्शन्स सुरू होतील-

आलिया रणबीरच्या लग्नाच्या जवळच्या सूत्रांचे म्हणणे आहे की- हे कपल १३ ते १७ एप्रिल दरम्यान लग्नबंधनात अडकणार आहेत. यादरम्यान त्यांच्या लग्नाआधीचे मेहंदी, हळदी आणि संगीताचे कार्यक्रमही आयोजित केले जातील. ज्यामध्ये कुटुंब आणि जवळच्या मित्रांशिवाय इंडस्ट्रीतील सेलिब्रिटीही हजेरी लावणार आहेत. याशिवाय, तो या महिन्याच्या अखेरीस त्याच्या उद्योगातील मित्रांसाठी रिसेप्शन देखील आयोजित करू शकतो.

हे डिझायनर तयार करणार आलिया-रणबीरचा पोशाख-

वृत्तानुसार, फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा ​​आणि सब्यसाची मुखर्जी लग्नासाठी आलिया भट्टचे कपडे तयार करतील.

हेही वाचा :

(व्हिडिओ, फोटो : alia_bhatt_obsessed insta वरून साभार)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news