

पुढारी ऑनलाईन डेस्क : 'तुला शिकवीन चांगलाच धडा' या मालिकेत मागच्या काही दिवसांत खूप ट्विस्ट येऊन गेले आणि प्रेक्षकांना ही ते खूपच मनोरंजक वाटत आहे. आता पर्यंतच्या भागात आपण पहिले की, व्याही जेवणाचा कार्यक्रम असल्याने सगळे जण खूप खुश आहेत. दुसरीकडे अधिपती भुवनेश्वरी अक्षरावर कुठल्या गोष्टीचा दबाव टाकून लग्नासाठी तयार करत आहे याचा शोध घेण्याचा प्रयत्न करतोय.
संबधित बातम्या
२८ आणि २९ सप्टेंबरच्या भागात आपण अक्षराच्या मेहेंदीचा कार्यक्रम पाहणार असून अक्षरा आणि अधिपतीची हळदही जोरदार दणक्यात साजरी होणार आहे. दोघांच्या नात्याला नवीन वळण येणार असून या हळदीच्या सोहळ्यात नक्की काय घडेल? व अजून काही जबरदस्त ट्विस्ट येईल का? हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे.
हेही वाचा :