Ganapath Teaser : टायगर श्रॉफच्या ‘गणपत’चे नवे पोस्टर, टीझर रिलीज डेट टळली | पुढारी

Ganapath Teaser : टायगर श्रॉफच्या 'गणपत'चे नवे पोस्टर, टीझर रिलीज डेट टळली

पुढारी ऑनलाईन : टायगर श्रॉफ आणि क्रीती सेनॉनच्या ‘गणपत’चे चित्रपटाचे नवे पोस्टर रिलीज झाले आहे. आज सलमान खानच्या टायगर ३ च्या चित्रपटाचे टीझर रिलीज झाले. त्यामुळे गणपत चित्रपटाची टीझर डेट पुढे ढकललीय. (Ganapath Teaser) २९ सप्टेंबर रोजी गणपतचा टीझर रिलीज होतोय. (Ganapath Teaser)

‘गणपत’ मध्ये टायगर श्रॉफ आणि क्रीती सेनॉन यांची केमिस्ट्री पाहायला मिळणार आहे. याआधी ही जोडी २०१४ मध्ये रिलीज झालेला चित्रपट ‘हिरोपंती’मध्ये दिसली होती. आता निर्मात्यांनी बुधवार २७ सप्टेंबरला ‘गणपत’ चे नवे पोस्टर जारी केले आहे. या पोस्टरमध्ये टायगर आणि कृतीची झलक पाहायला मिळत आहे. २९ सप्टेंबर रोजी या चित्रपटाचा टीझर रिलीज होईल.

टायगरने आपल्या अधिकृत इन्स्टाग्रामवर चित्रपटाचे नवे पोस्टर शेअर केले आहे. कॅप्शनमध्ये लिहिलंय, ‘आम्हाला भेटण्यासाठी आणखी थोडी प्रतीक्षा, कारण आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत आहे, काही खास. ‘गणपत’चा टीझर २९ सप्टेंबर, २०२३ रोजी येत आहे.’

‘गणपत’ २० ऑक्टोबरला हिंदी, तेलुगू, तमिल, मल्याळम आणि कन्नड चित्रपटगृहात रिलीज होईल. या चित्रपटाचे दिग्दर्शन विकास बहलने केले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Tiger Shroff (@tigerjackieshroff)

Back to top button