तुला शिकवीन चांगलाच धडा : अक्षरा अधिपती साखरपुडा विशेष सप्ताह

पुढारी ऑनलाईन डेस्क : प्रेक्षकांची आवडती मालिका ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ यात अक्षरा आणि अधिपतीच्या नात्यात एक नवे आणि रोमांचक वळण येणार आहे. झी मराठीच्या सोशल मीडिया पेजवर या मालिकेचा प्रोमो आहे. येत्या ४ सप्टेंबरपासून ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मालिकेत अक्षरा आणि अधिपतीचा साखरपुडा विशेष सप्ताह प्रेक्षकांना पाहायला मिळेल.
शाळेत सर्व शिक्षक आणि विद्यार्थी अक्षराला अभिनंदन करतात व अगदी आनंदाने शुभेच्छा देतात. अक्षरा गोंधळून जाते. नंतर भुवनेश्वरी शाळेत येऊन अक्षराला ४ तारखेला तिचा आणि अधिपतीचा धुमधडाक्यात साखरपुडा होणार अशी घोषणा करते, अक्षरा हे सगळं बघून थक्क होते. आता या साखरपुडा विशेष सप्ताह भागांमध्ये काय धमाल घडणार. काय असणार भुवनेश्वरीचा नवीन डाव?