Prabhas : म्हैसूर वॅक्स म्युझियममधील बाहुबलीच्या पुतळ्यावरून वाद, भडकले निर्माते | पुढारी

Prabhas : म्हैसूर वॅक्स म्युझियममधील बाहुबलीच्या पुतळ्यावरून वाद, भडकले निर्माते

पुढारी ऑनलाईन : साऊथ सूपरस्टार अभिनेता प्रभासचा मेणाचा पुतळा कर्नाटकातील मैसूर संग्रहालयात ठेवण्यात आला आहे. (Prabhas) एस एस राजामौलीच्या बाहुबली चित्रपटातून प्रभासने आपण सुपरस्टार असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध केले. बाहुबली फ्रँचायझीमे अडीच हजार कोटींचे बॉक्स ऑफिस कलेक्शन केले होते. दरम्यान, रविवारी प्रभासच्या फॅन्सनी मैसूर येथील वॅक्स म्युझियममधील प्रभासचा बाहुबली रुपातील मेणाच्या पुतळ्याचा फोटो पोस्ट केला. (Prabhas)

या फोटोने चित्रपटाचे निर्माते शोभू यारलागड्डा यांचे लक्ष वेधून घेतले. चित्रपटातील प्रभासच्या पात्राशी पुतळा थोडेसे साम्य असल्याचे लक्षात येताच, निर्मात्याने सोशल मीडिया पोस्टला संतापाने प्रतिक्रिया दिली. तसेट आणि म्हैसूर संग्रहालयाला इशाराही दिला. त्यांच्या ट्विटमध्ये, त्यांनी म्हटले की, अधिकृतपणे र्मात्यांच्या कोणत्याही परवानगीशिवाय किंवा माहितीशिवाय हा पुतळा कसा उभारला गेला. पुतळा हटवण्यासाठी तातडीने पावले उचलण्याचा इशाराही त्यांनी दिला.

काय आहे प्रकरण?

शोबू यांनी ट्विट केलं, हे अदिकृत लायसेन्स काम केलेलं नाही. आमची परवानगी न घेता आणि माहिती न देता पुतळा उभारण्यात आला आहे. आम्ही हे हटवण्यासाठी तत्काळ पावले उचलू.’ शोबू यांच्या या ट्विटवर फॅन्सचेदेखील रिॲक्शन येत आहेत. ते कॉमेंट करत आहेत की, हा कोणता पुतळा आहे, प्रभाससारखा तर अजिबात दिसत नाही.

Back to top button