तुला शिकवीन चांगलाच धडा : माझ्या भूमिकेच्या बऱ्याच शेड्स आहेत-अक्षय विंचूरकर

akshay vinchurkar
akshay vinchurkar
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : 'तुला शिकवीन चांगलाच' धडा ही खूप मनोरंजक मालिका आहे. प्रेक्षकांना ही मालिका बघून नेहमी प्रश्न पडत असेल शिक्षण मोठं की पैसे? या मालिकेत खूप वेगवेगळी पात्र आहेत, ज्यांचे वर्णन आणि भूमिका खूप छान फुलवल्या आहेत. जसजशी ही मालिका पुढे जातेय तसं तशी खूप मनोरंजक होणार आहे. मी ह्यात कमल कानफाडेची भूमिका साकारत आहे. माझ्याही भूमिकेच्या काही शेड्स आहेत. प्रेक्षकांनी माझे पात्र बघितलेच असेल कमलचा पेहराव खूप साधा आहे व त्याच पात्र आधी खूप चांगलं दाखवले गेले. पण आतापर्यंत जे मालिकेत ट्विस्ट आले आहेत, त्याच प्रमाणे कमलची भूमिका आता नकारात्मकतेकडे वळली आहे. एकाच वेळी इतके वैविध्य ह्या भूमिकेत असल्याने ती साकारताना खूप चांगला अनुभव मिळतो.

संबंधित बातम्या –

आपल्या सहकलाकारांबद्दल तो सांगतो, सगळ्यांकडून खूप शिकायला मिळतं. सेटवर आमची खूप मज्जा मस्ती चालते. आमच्या मालिकेत खूप अनुभवी कलाकार आहेत. त्यांच्याकडून भरपूर वेगवेगळ्या गोष्टी शिकायला मिळतात. सेटवरचा अनुभव खूप वेगळा असतो, त्यामुळे खूप प्रसन्न वाटतं. सगळे एकत्र छान रिडींग करतात, सगळ्यांचे ताळमेळ एकदम छान जुळून येतात. अगदी आमचं शूट चालू असताना पण धम्माल असते.

अक्षयने बेडेकर कॉलेजमधून मॅनेजमेंटमध्ये पदवी घेतलीय. मुंबई विद्यापीठातून पॉलिटिक्समध्ये पदव्युत्तर पदवी घेतलीय. बारावीनंतर एका नाट्यसंस्थेतून विविध एकांकिका आणि प्रयोगिक नाटकात त्याने काम केले आहे. बरेच प्रायोगिक व व्यावसायिक नाटके केली. शिवाय चित्रपटात आणि वेब सीरिजमध्ये काम केलं आहे.

तो म्हणतो, आता तर झी मराठीच्या मालिकेत काम करण्याची सुवर्णसंधी मिळाली. मी माझ्या परीने माझ्या पात्राला पूर्णपणे न्याय देण्यासाठी प्रयत्नशील आहे. मला एकदा एक काका भेटले व त्यांनी मला प्रेमाने सांगितले एवढा चांगला राहतोस, इस्त्रीचे शर्ट पॅन्ट घालतो, भांग पाडून केस व्यवस्थित ठेवतो. पण अक्षरासोबत असा का वागतोस ? हे ऐकून मला हसू आले आणि मी त्यांना सांगितले काका मी काय करू माझी भूमिकाच तशी आहे. पण त्या प्रसंगावरून मला कळले माझे काम लोकांना दिसून येतंय व माझी भूमिका त्यांना कळली आहे. असे बरेच प्रसंग आहेत आणि ह्याच प्रसगांमुळे मला प्रेरणा मिळते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news