युक्रेनमध्ये अडकलाय अकोल्याचा जॅकशारोन  

युक्रेनमध्ये अडकलाय अकोल्याचा जॅकशारोन  

Published on

अकोला, पुढारी वृत्तसेवा 

रशियाने बुधवारी रात्रीच्या सुमारास युक्रेनच्या काही भागांमध्ये हवाई हल्ले केल्यामुळे रशिया आणि युक्रेनमधील वाद आणखीनच चिघळला आहे. अशा परिस्थितीत भारतात युक्रेनमध्ये शिक्षण घेत असलेल्या आपल्या मुलांना मायदेशी परत आणण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. युक्रेनमध्ये सध्या महाराष्ट्रातील तब्बल 1200 विद्यार्थी अडकले असून, त्यामध्ये अकोल्‍यातील जॅकशारोन एडवर्ड निक्सन या वीस वर्षीय युवकाचाही समावेश आहे. सध्याच्या युद्धजन्य परिस्थितीत आपल्या मायदेशी परतण्याची ओढ त्‍याला लागली आहे.

जॅक हा विद्यार्थी युक्रेनची राजधानी कीव शहरातील डायलो हॅलीस्काय नॅशनल मेडिकल युनिव्हर्सिटी मध्ये 'एमबीबीएस'चा द्वितीय वर्षात आहे. आई अमलमेरी निक्सन या महानगरपालिकेच्या शाळेत मुख्याध्यापिका आहेत. युक्रेनमध्ये महाराष्ट्रातील जवळपास 1200 विद्यार्थी अडकले आहेत. त्यात पुन्हा आंतरराष्ट्रीय विमानाचे दर वाढल्याने मायदेशी परतणे या मुलांसाठी कठीण होत आहे.

सुत्राच्या माहितीनुसार, सध्या युक्रेनमध्ये जवळपास 20 हजार विदेशी नागरिक आहेत. आणि यामध्ये 18 हजार भारतीय तर दोन हजार विद्यार्थी आहेत. सर्वच राज्य सरकारांकडून आपापल्या राज्यातील मुलांसोबत संपर्क साधला जात आहे. किती विद्यार्थी आहेत, कुणाला कोणती मदत हवी, याची माहिती घेतली जात आहे,

ऐनवेळी विमान रद्द

युक्रेनमध्ये अडकलेले भारतीय विद्यार्थी भारतीय दुतावास कार्यालयाच्या सातत्याने संपर्कात असून, दुतावासाने त्यांच्या परतण्यासाठी विमानाची व्यवस्था केली जाईल असे सांगितले आहे. याचाच एक भाग म्हणून मंगळवारी एअर इंडियाचे विमान युक्रेनला पाठविण्यात आले होते. हे विमान २४२ जणांना घेऊन भारतात परतले आहे. दुसरे विमान गुरूवारी पहाटे भारताकडे प्रस्थान करणार होते. परंतु काल रात्री रशियाने केलेल्या हवाई हल्ल्यामुळे हे विमान रद्द करण्यात आले आहे.

हे ही वाचा 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news