Akanksha Puri : कधी डिप नेक ब्लाऊज तर कधी ब्रालेट-ओव्हरसाईज शर्ट

akanksha puri
akanksha puri
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : स्वयंवर शोमध्ये येऊन लोकप्रिय गायक मिका सिंगचं हृदय जिंकणारी आकांक्षा पुरीने ब्रालेट-ओव्हरसाईज शर्टमध्ये फोटोशूट केला आहे. (Akanksha Puri) ब्लॅक कलर बोल्ड शर्टमध्ये आकांक्षाने हा फोटोशूट केला आहे. मोकल्या केसात बोल्ड पोझ देऊन आकांक्षाने हे पोटोज आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटला शेअर केले आहेत. तिचा ग्लॅमरस लूक सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. याला ग्लॅमरस ट्रीट म्हणणं अधिक योग्य ठरेल. (Akanksha Puri)

आकांक्षा पुरी हिने हे पोस्ट केल्यानंतर चाहत्यांनी या पोस्टवर उड्या घेतल्या आहेत. आकांक्षाने तिचे ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत. हे फोटो कमेंट्स करायला भाग पाडणारे आहेत. आकांक्षा ओव्हरसाईज्ड काळ्या शर्टमध्ये खूपच बोल्ड दिसतेय. दिसत आहे. आकांक्षाने काळ्या रंगाचा ब्रॅलेट शर्ट परीधान केला आहे.

तिच्या या फोटोंवरून नजर हटत नाही. तिचा ग्लॅमरस स्टाईलवरून चाहत्यांच्या नजरा तर हटत नाहीत शिवाय, तिला नेटकरी वाढदिवसाच्या शुभेच्छाही देत आहेत. कारण आकांक्षाने फोटो पोस्ट करताना My Birthday Vibe ? Happy birthday to me ……!! अशी कॅप्शन लिहिलीय.

आकांक्षा मोकळ्या केसांमध्ये, ग्लोईंग मेकअपमध्ये खूपच सुंदर दिसतेय. तिच्या किलर पोजने आकांक्षाने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. आकांक्षाच्या या पोस्टवर तिचा बॉयफ्रेंड मिका सिंगनेही कमेंट केली आहे. Happy birthday sweetheart ❤️ अशी कमेंट मिकाने कमेंट बॉक्समध्ये लिहिलेली दिसते.

सेलेब्स आणि चाहते आकांक्षाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देत आहेत. आकांक्षाचा किलर लूक आणि सुपर डुपर सिझलिंग फोटोज पाहून Beautiful, Uff, Super Gorgeous, Hi Summer, Fire, अशा कमेंट्स नेटकऱ्यांकडून मिळत आहेत. आकांक्षा सोशल मीडियावर नेहमीच ग्लॅमरस फोटो शेअर करत असते. आकांक्षाची स्टाईल आणि फॅशन सेन्स प्रभाव टाकणारे आहे.

आकांक्षा अनेक टीव्ही शोमध्ये दिसली आहे. नुकतीच ती तिचा खास मित्र मिका सिंगच्या स्वयंवरला पोहोचली होती. दोघेही जवळपास १२ वर्षांपासून एकमेकांना ओळखतात. मिकाला आपली वधू शोधत असल्याचे पाहून आकांक्षाला तिच्या प्रेमाची जाणीव झाली आणि ती स्वयंवर शोमध्ये आली.

रिअॅलिटी शोच्या फिनालेमध्ये मिकाने आकांक्षाला निवडले. दोघांनी एकमेकांना पुष्पहार घातला. आता दोघेही मैत्रीच्या टप्प्यातून बाहेर पडल्यानंतर डेट करत आहेत. त्यांचा अजून लग्नाचा कोणताही विचार नसल्याचे वृत्त आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news