swara bhaskar tweet : स्वरा भास्कराच्या व्हॅलेंटाईननिमित्त शुभेच्छा, म्हणाली, “प्रेम करायला विसरणाऱ्या…”
पुढारी ऑनलाईन :
अभिनेत्री स्वरा भास्कर सोशल मीडीयावर नेहमीच चर्चेत असते. आज ती पुन्हा चर्चेत आली आहे ते 'व्हॅलेंटाईन डे'निमित्त केलेल्या ट्विटमुळे. ( swara bhaskar tweet ) स्वराने केलेल्या ट्विटवर नेटिझन्सकडून प्रचंड प्रतिक्रियाही येत आहेत.
swara bhaskar tweet : स्वराच्या ट्विटवर संमिश्र प्रतिक्रिया
आजचा 'व्हॅलेंटाईन डे'. बॉलिवूड सिनेकलेकार आपापल्या परीने साजरा करत करून, आपल्या प्रियजनांना शुभेच्छा देत आहेत. बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्करनेही 'व्हॅलेंटाईन डे' च्या शुभेच्छा दिल्या आहेत. ट्विटवर ट्विट केलेल्या मेसेजमध्ये तिने म्हटले आहे की, "प्रेम करायला विसरणाऱ्या देशाला 'व्हॅलेंटन डे' च्या शुभेच्छा." असे तिने आपल्या ट्विटर हॅडेलवरून हे ट्विट केले आहे. तिच्या या ट्विटवर चाहते आपापल्या पद्धतीने प्रतिक्रिया देत आहेत. स्वराने ट्विट केलेल्या या संदेशात खोल गोष्टी दडलेल्या आहे, असेही काहीनी म्हटले आहे. या ट्विटबद्दल नेटिझन्सकडून संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत.
बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर हि 'तनू वेड्स मनू' , 'रांजना' , 'चिल्लर पार्टी' , 'निल बट्टे सन्नाटा' आणि 'वीरे दी वेडिंग' यांसारख्या चित्रपटांमधील तिच्या दमदार अभिनयासाठी ओळखली जाते. तिच्या आगामी चित्रपटाबद्दल बोलायचे झाले तर, ती लवकरच 'जहां चार यार' चित्रपटात दिसणार आहे. याशिवाय तिचा 'शीर कोरमा' हा चित्रपट जगभरातील चित्रपट महोत्सवांमध्ये चर्चेत आहे.
व्हॅलेंटाईन डे स्पेशल – प्रेम एक भावना… अशा अनेक प्रश्नांच्या उत्तरांसाठी हा व्हिडिओ नक्की बघा.
हेहि वाचलत का?
- Jhund song : अमिताभ बच्चन यांच्या झुंड चित्रपटातील 'आया ये झुंड है' गाणे रिलीज
- Valentine's day ला कृष्णा आणि राया करणार एकमेकांना मराठमोळ्या पद्धतीने प्रपोज…
- Valentine's Day : डिअर राजीवजी, मी तुमच्यावर निरंतर प्रेम करत राहीन, आमदार प्रज्ञा सातव झाल्या भावूक
- पुष्पा: द राइज : श्रीवल्लीच्या इंग्रजी व्हर्जनचा सोशल मीडियावर धुमाकूळ (व्हिडिओ)

