

पुढारी ऑनलाईन; साऊथ अभिनेता अल्लू अर्जुन (Allu Arjun) आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) याच्या 'पुष्पा: द राइज' चित्रपट गेल्या डिसेंबर महिन्यात रिलीज झाला. दोनच महिन्यात या चित्रपटाने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. या चित्रपटातील अल्लूचे धमाकेदार संवाद, आकर्षक गाणी आणि सोशल मीडियावरील त्याचे स्टेप्स प्रचंड व्हायरल होत आहेत. या चित्रपटातील श्रीवल्ली या गाण्याच्या स्टेपने चाहत्यांसोबत बॉलिवूड कलाकारांनी देखील भूरळ पडली आहे. हे गाणे सध्या वेगवेगळ्या भाषांमध्ये चाहत्याच्या भेटीस येत आहेत. अलीकडेच श्रीवल्लीचे भोजपुरी गाणे (व्हर्जन) रिलीज झाले होते. आता अल्लू अर्जुनच्या गाण्याचे इंग्रजी व्हर्जन समोर आले आहे. श्रीवल्लीचे इंग्रजी गाणे इतके सुंदररित्या गायिले आहे की, ते मूळ गाण्याशी टक्कर देत आहे.
रश्मिका आणि अल्लू अर्जुन यांच्या 'पुष्पा: द राइज' चित्रपटाला चाहत्यांनी डोक्यावर घेतले आहे. या चित्रपटातील श्रीवल्ली गाण्यासोबत स्टेपनी चाहते भारावून गेले आहेत. याच दरम्यान सर्वत्र गाण्याची वेगवेगळ्या भाषेत येत आहे. नुकतेच विदेशी गायिका एमा हिस्टर्स (Emma Heesters) हिने श्रीवल्लीच्या इंग्रजी व्हर्जनला आपला सुमधूर आवाज दिला. श्रीवल्ली हे गाणे सोशल मीडियावर व्हायरल होताच चाहते तिचे कौतुक करत आहेत. एमाने गायिलेल्या इंग्रजी गाण्यात तेलुगू भाषेचे सुंदर दर्शन चाहत्यांना पाहायला मिळत आहे.
श्रीवल्लीच्या इंग्रजी व्हर्जनला यूट्यूबवर आतापर्यंत १३ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. एम्मा हिस्टर्स ही एक विदेशी गायिका असून सोशल मीडियावर सक्रिय असते. ती नेहमी आपल्या सुमधूर गाण्याचा व्हिडिओ शेअर करत असते. एम्माच्या यूट्यूब चॅनेलवर ५.१ कोटीहून अधिक सबस्क्राइबर्स आहेत.
श्रीवल्लीच्या गाण्याने वेगवेगळ्या भाषांमध्ये लोकप्रियता सातत्याने वाढत आहे. पुष्पा चित्रपटातील गाण्यांपासून ते डायलॉग्सपर्यंत सोशल मीडियावर रील्सची धूम पाहायला मिळत आहे. रश्मिका मंदान्ना आणि अल्लू अर्जुन यांच्या या चित्रपटाने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. चित्रपट प्रदर्शित होऊन २ महिने उलटले तरी चाहते पुष्पावर भरभरून प्रेम करत आहेत.
हेही वाचलंत का?