Parineeti Chopra : अखेर ठरलं! अभिनेत्री परिणीती चोप्रा चढणार बोहल्यावर?; ‘आप’चे खासदार अरोरांची माहिती

Parineeti Chopra : अखेर ठरलं! अभिनेत्री परिणीती चोप्रा चढणार बोहल्यावर?; ‘आप’चे खासदार अरोरांची माहिती

Published on

पुढारी ऑनलाईन डेस्क : अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि आम आदमी पार्टीचे खासदार राघव चड्ढा यांच्यातील नात्‍याची चर्चा मागील काही दिवसांपासून सुरु होती.  दोघांच्या नात्याबद्दल कुटुंबियांची बोलणीही सुरू असल्याची माहिती समोर आली होती.आता या दोघांच्या नात्यावर आम आदमी पक्षाचे खासदार संजीव अरोरा यांनी ट्वीट करून शिक्कामोर्तब केल आहे. (Parineeti Chopra)

आपल्या ट्वीटमध्ये संजीव अरोरा म्हणतात 'राघव चड्ढा आणि परिणीती चोप्रा यांना माझ्या मनःपूर्वक शुभेच्छा. तुम्हा दोघांचं नातं प्रेम, आनंद आणि सहवासाने भरलेलं असावं. माझ्या खूप शुभेच्छा' (Parineeti Chopra)

राघव आणि परिणीती हे दोघेही लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये एकत्र शिक्षण घेतले आहे. रिपोर्टनुसार, कुटुंबियांनी लग्नाबद्दल बोलणी सुरू केल्याची चर्चा आहे. 'टाइम्स ऑफ इंडिया'मधील एका वृत्तानुसार, परिणीती आणि राघव यांच्या कुटुंबियांनी लग्नाबाबत चर्चा सुरू केली आहेत. अशातच आप खासदारांनी दिलेल्या दोघांना दिलेल्या शुभेच्छांमुळे त्यांच्या नात्यावर शिक्कामोर्तब झाल्‍याचे मानले जात आहे.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news