naga chaitanya
naga chaitanya

Naga Chaitanya House : पहिल्यांदा हॉटेलमध्ये घालवले दिवस, आता इतक्या कोटींचे घेतलं घर

Published on

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेत्री सांमथा रूथ प्रभूने घटस्फोटासाठी न्यायालयात अर्ज दाखल केल्यानंतर नागा तिच्यापासून वेगळे होऊन एका हॉटेलमध्ये राहत होता, अशी मीडिया रिपोर्टनुसार माहिती आहे.  दरम्यान आता नागाने ( Naga Chaitanya House ) हैदराबाद येथील एक चांगल्या परिसरात नवीन आलिशान घरं घेतले आहे. या घराची किमंत पाहून चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नागाने हैदराबादमध्ये पॉश कॉलनी जुबली हिल्स येथे आलिशान घर खरेदी केलं आहे. या घरांची किंमत जवळपास १५ कोटी रूपयांच्या आसपास आहे. नागाने आधीच घर खरेदी केले असून आता त्याचे हाऊस वॉर्मिंगपासून ते डिझाईन डेकोरेशन करण्यात येत आहे. हे आलिशान घर नागाच्या कुटुंबाच्या घराजवळ आहे. घराचे डेकोरेशन करताना नागा एका हॉटेसमध्ये राहत होता. यानंतर त्याने रितसर घरात गृहप्रवेश केला आहे.

नागा चैतन्य आणि सामंथाचा घटस्फोट झाला. घटस्फोटाची प्रक्रिया सुरू होताच नागाने सांमथासोबत राहत असलेला बंगला सोडला आणि वडील नागार्जुनच्या घरी शिफ्ट झाला होता. दरम्यान सामंथाने एक मोठी किंमत घेवून आपला बंगला विकल्याची माहिती समोर आली होती.

वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर नागा चैतन्य आमिर खानसोबतच्या 'लाल सिंह चड्ढा' या चित्रपटात दिसला होता. यानंतर तो व्यंकट प्रभू यांच्या 'कस्टडी' या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात नागासोबत क्रिती शेट्टी, अरविंद स्वामी आणि प्रियामणी यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. तर सामंथा 'द फॅमिली मॅन २', 'यशोदा' आणि 'पुष्पा' च्या 'ओ उंटावा' या आयटम सॉंगमध्ये दिसली होती.

हेही वाचा : 

 

View this post on Instagram

 

A post shared by Chay Akkineni (@chayakkineni)

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news