Ashadhi Wari 2023 : लाखो वारकऱ्यांसाठी मोठी घोषणा, शासनातर्फे विमा संरक्षण लागू
पुढारी ऑनलाईन डेस्क : पंढरपूरच्या आषाढी वारीत सहभागी झालेल्या वारकऱ्यांना शासनातर्फे विमा संरक्षण देणारी 'विठ्ठल रुक्मिणी वारकरी विमा छत्र' योजना लागू करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. या निर्णयामुळे लाखो वारकऱ्यांना शासनाच्या खर्चाने विमा संरक्षण मिळणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विट करत माहिती दिली आहे. जाणून घ्या 'विठ्ठल रुक्मिणी वारकरी विमा छत्र' योजनेअंतर्गत कोणत्या सुविधा मिळणार. (Ashadhi Wari 2023)
वारीच्या ३० दिवसांसाठी संरक्षण
आषाढी एकादशी २९ जून रोजी आहे. विठ्ठलाच्या दर्शनासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लोक जात आहेत. लाखो भाविक मजल-दरमजल करत विठ्ठ्लाच्या भेटीसाठी जात असतात. या प्रवासादरम्यान वारकरी आजारी किंवा अपघात यामुळे जखमी, मृत्यू होत असतात. हे टाळण्यासाठी राज्य सरकारने वारकऱ्यांना विमा संरक्षण दिलं आहे. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विट करत 'विठ्ठल रुक्मिणी वारकरी विमा छत्र' योजना लागू करण्याची घोषणा केली आहे.
या योजनेमुळे हजारो वारकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे, त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हंटल आहे की," पंढरपूरच्या आषाढी वारीत सहभागी झालेल्या वारकऱ्यांना शासनातर्फे विमा संरक्षण देणारी 'विठ्ठल रुक्मिणी वारकरी विमा छत्र' योजना लागू करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. या निर्णयामुळे लाखो वारकऱ्यांना शासनाच्या खर्चाने विमा संरक्षण मिळणार आहे." या योजनाचे संरक्षण वारीच्या ३० दिवसांसाठी असणार आहे. मदत व पुनर्वसन विभागामार्फत ही योजना राबविण्यात येणार आहे.
Ashadhi Wari 2023 : योजनेत 'या' बाबींचा समावेश
- एखाद्या वारकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबियांस ५ लाख रुपये सानुग्रह अनुदान देण्यात येईल.
- दुर्घटनेत कायमचे अपंगत्व किंवा विकलांगता आल्यास १ लाख रुपये देण्यात येतील.
- अंशत: अपंगत्व आल्यास ५० हजार रुपये देण्यात येतील वारीच्या दरम्यान आजारी पडल्यास औषधोपचारासाठी ३५ हजार रुपयापर्यंतचा खर्च मिळणार.
- वारीच्या दरम्यान अपघात किंवा दुर्घटना होतात आणि त्यात वारकरी जखमी होतात किंवा त्यांचा दुर्दैवी मृत्यू होतो.
ट्विटमध्ये पुढे असे म्हंटले आहे की, वारकरी आणि त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत मिळावी या उद्देशाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा निर्णय घेतला आहे.
हेही वाचा
- Saliva Pregnancy Test Kit : आई होण्याची Good News मिळणार फक्त 'लाळ' चाचणीद्वारे! युकेत जगातील पहिली 'सॅलिस्टिक गर्भधारणा किट' लाँच
- पंढरीच्या आषाढी वारीसाठी उजनी धरणातून भीमा नदीत आजपासून पाणी सोडले
- आषाढी वारी : हरित वारी स्वच्छ वारी' संकल्पनेवर आधारीत नियोजन -मुख्य कार्यकारी अधिकारी | Aashadhi Wari
- पंढरपूर : निर्बंधमुक्त पंढरीत आषाढी वारी भरणार

