बेंबळे ; पुढारी वृत्तसेवा महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या पंढरीच्या पांडुरंगाच्या आषाढी वारीचा सोहळा 29 जून रोजी संपन्न होणार आहे. त्यासाठी उजनी धरणातून भीमा नदीत सकाळी 9 वाजता पाणी सोडण्यास सूरुवात केली आहे. 4 गाळ मोरीतून 1500 क्युसेकने सुरुवात केली असुन, त्यात टप्प्याटप्प्याने सायंकाळपर्यंत वाढ केली जाणार आहे. 24 तारखेला पाणी पंढरपूर येथे पोहचेल असे नियोजन करण्यात आले आहे. व ते पाणी 29 जून रोजी बंद करण्यात येणार असल्याची माहिती जलसंपदा सोलापूरचे अधीक्षक अभियंता धीरज साळे यांनी दिलेली आहे.
10 मे पासून शेतीसाठी पाणी पुरवणारे कालवा, बोगदा, सिंचन योजना, नदी असे सर्व स्रोत बंद झाले आहेत. त्यातच यावर्षीचा पावसाळा सुरू होऊन पंधरा दिवस होऊन गेले आहेत. परंतु जिल्ह्यात एक थेंब देखील पावसाचा आलेला नसल्यामुळे आणि वरचेवर उष्णतेत वाढ होत असल्यामुळे उजनी धरणावर अवलंबून असलेली लाखो एकर क्षेत्रातील बागायती पिके पाण्याअभावी जळून जाण्याची मोठी भीती निर्माण झाली आहे.
सध्या उजनी धरणात एकुण 47.80 टीएमसी पाणीसाठा शिल्लक असून, त्याची टक्केवारी मायनस, (उणे) – 29.61 (-15.86 टीमसी ) अशी आहे. धरणातील पाणी पातळी 488.470 मीटर असून धरणातून कालवा बोगदा नदी सीना माढा दहिगाव सिंचन योजना या सर्व ठिकाणी पाण्याचा विसर्ग शेतीसाठी बंद पडलेला आहे.
हेही वाचा :