

पुणे : पुणे शहरातील गाजलेल्या बुधवार पेठेत पोलिसांचा कारवाईचा धडाका सुरुच आहे. पुणे पोलिसांनी बुधवार पेठे परिसरात पुन्हा एकदा मोठी कारवाई करत बेकायदा वास्तव्य करणार्या सात बांगलादेशी महिलांना गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने ताब्यात घेऊन, याप्रकरणी फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुण्यातील बुधवार पेठेमध्ये काही बांगलादेशी नागरिक बेकायदा वास्तव्य करत असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली. त्यानुसार पोलिसांच्या पथकाने छापा टाकून सात बांगलादेशी महिलांना अटक केली. अटक करण्यात आलेल्या महिला गेल्या चार वर्षापासून पुण्यात बेकायदा वास्तव्य करत असल्याचे तपासात उघडकीस आले आहे.
पोलिसांनी त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांच्याकडे वास्तवाबाबतची कागदपत्रे आढळून आली नाहीत. सामाजिक सुरक्षा विभागाचे पोलीस हवालदार इरफान शेरखान पठाण यांनी फिर्याद दिली असून पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास फरासखाना पोलीस करत आहेत.
पोलीस अतिरिक्त आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त गुन्हे अमोल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक भारत जाधव, सहाय्यक निरीक्षक अश्विनी पाटील, सहायक पोलीस निरीक्षक अनिकेत पोटे, सहायक पोलीस निरीक्षक राजेश माळगावे, राजेंद्र कुमावत, बाबा कर्पे, तुषार भीवरकर, अजय राणे, इरफान पठाण, अमेय रसाळ, हनुमंत कांबळे, अमित जमदाडे, किशोर भुजबळ, ओंकार कुंभार, रेश्मा कंक आदींनी ही करवाई केली.
काही दिवसापूर्वीच पुणे पोलिसांनी बुधवार पेठ परिसरात मोठी कारवाई करत बेकायदा वास्तव्य करणार्या तब्बल २६ बांगलादेशी नागरिकांना पकडण्यात आले होते. या कारवाईत पंधरा महिला आणि अठरा नागरींक तर एका अल्पवयीन मुलीला देखील ताब्यात घेण्यात आले होते. या अल्पवयीन मुलीला बांगलादेशातून पुण्यात वेश्याव्यवसाय करण्यासाठी आणण्यात आले होते. त्यांच्याविरुद्ध पारपत्र अधिनियम 1950, तसेच परकीय नागरिक आदेश 1978 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याप्रमाणेच गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने पुन्हा एकदा ही बुधवार पेठ परिसरात मोठी कारवाई केली आहे.
हेही वाचा