असाही फोटो जो मिळवून देईल 8 कोटी रुपये!

असाही फोटो जो मिळवून देईल 8 कोटी रुपये!
Published on
Updated on

वॉशिंग्टन : स्मार्ट फोन आले, त्या वेळेपासून फोटो काढणे अतिशय सोपे झाले आहे. आता कोणीही कुठेही छायाचित्र घेऊ शकते. कारण, जवळपास प्रत्येकाच्या हातात स्मार्ट फोन हा असतोच असतो. आता असाच एक फोटो आपल्याला कोट्यधीश बनवू शकतो, असे म्हटले तर ते वावगे वाटू शकते. पण, एका अमेरिकन कंपनीने खरोखरच अशी अजब ऑफर जाहीर केली आहे. ही कंपनी फक्त एका फोटोसाठी 1 बिलियन डॉलर म्हणजे 8 कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम बक्षीस रूपात देण्यास तयार आहे. पण, यासाठी त्यांची अशी अट आहे की, हा फोटो फक्त एलियन्स किंवा त्याचे यान युएफओचेच असायला हवे!

अमेजन रिंगने डोरवेल कॅमेरा लाँच करताना ही अनोखी योजना जाहीर केली. जवळपास 100 वर्षांपासून शास्त्रज्ञ, जाणकार, तज्ज्ञांनी एलियन्सशी संबंधित कल्पनाचित्रे सादर करत त्याबरोबरीने अनेक दावे-प्रतिदावे केले आहेत. काही व्हिडीओदेखील समोर आणले गेले आहेत. मात्र, रिंग्ज मिलियन डॉलर सर्च फॉर एक्स्ट्रा टेरेस्ट्रियल्स या अभिनव योजनेंतर्गत अनोखी ऑफर जाहीर करताना एलियन्सबद्दल आणखी जाणून घेण्यासाठी प्रेरणा देणे, हा उद्देश असल्याचे कंपनीने म्हटले आहे.

काही अभ्यासकांचा नेहमी असा दावा राहत आला आहे की, एलियन्स पृथ्वीवर संपर्क करण्याचा प्रयत्न करत असतात. अमेरिका-ऑस्ट्रेलियासह काही देशांमधून युएफओ पाहिले गेल्याचे दावेही केले गेले आहेत. या पार्श्वभूमीवर, एलियन्स किंवा युएफओचे छायाचित्र घेतल्यास आपण कोट्यधीश होऊ शकता, असे कंपनीने आपल्या ऑफरमध्ये म्हटले आहे.

कंपनीने याबाबत सर्व अटी जाहीर केल्या असून, छायाचित्र पाठवले गेले, तर अंतराळ तज्ज्ञांचे पथक त्याची चाचपणी करेल, असे म्हटले आहे. एलियन्स किंवा युएफओचे छायाचित्र निवडले गेले तर केवळ कोट्यवधीचे इनाम नव्हे तर अन्य अनेक भेटवस्तू, गिफ्ट कार्डही प्रदान केले जाणार आहे. यापूर्वी जुलैमध्ये लुईसियानातील एका व्यक्तीने आकाशात पसरलेल्या हिरव्या आगीच्या गोळ्याचा लोळ आपल्या कॅमेर्‍यात टिपला होता. मात्र, तज्ज्ञांनी त्याचा दावा फेटाळून लावला होता. तो हिरवा प्रकाश एका उल्केचा होता, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले होते. त्यावेळी अनेकांचा असा दावा होता की, तो एक एलियन होता, जो पेलिकन राज्यात उतरत होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news