New Zealand Hostel Fire : न्यूझीलंडमध्ये हॉस्टेलला भीषण आग; १० जणांचा मृत्यू

New Zealand Hostel Fire : न्यूझीलंडमध्ये हॉस्टेलला भीषण आग; १० जणांचा मृत्यू
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : न्यूझीलंडमधील वेलिंगटन येथे चार मजली हॉस्टेलला आग लागली. यामध्ये सुमारे १० जणांचा मृत्यू झाला आहे. ही घटना सोमवारी रात्री घडली. आगीची माहिती मिळताच बचाव पथक आणि अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि आग विझवण्याचे काम सुरू केले. बचाव पथकाने ढिगाऱ्याखालून लोकांचा शोध सुरू केला आहे.

वेलिंग्टन येथील चार मजली लोफर्स लॉज हॉस्टेलला तिसऱ्या मजल्यावर रात्री साडेबारा वाजता आग लागली. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या अपघातात किमान २० जण बेपत्ता असल्याची माहिती मिळत आहे. वेलिंग्टन फायर आणि आपत्कालीन जिल्हा व्यवस्थापक निक पायट यांनी सांगितले की, वसतिगृहात सुमारे ५२ लोक अडकले आहेत. बचाव पथक अजूनही त्यांचा शोध घेत आहे. रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास आग लागल्याची माहिती दिली होती, असे त्यांनी सांगितले.

न्यूझीलंड हेराल्डच्या वृत्तानुसार, आग जवळपास रात्रभर सुरू होती, ज्यामध्ये 10 जणांचा मृत्यू झाला. देशाचे पंतप्रधान ख्रिस हिपकिन्स यांनी एएम मॉर्निंग न्यूज कार्यक्रमात सांगितले की, त्यांच्या मते ६ लोकांच्या मृत्यूची पुष्टी झाली आहे आणि आकडा आणखी वाढण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे.

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news