‘JD 2’ Asteroid : ‘जेडी 2’ लघुग्रह उद्या पृथ्वीच्या जवळून जाणार | पुढारी

'JD 2' Asteroid : ‘जेडी 2’ लघुग्रह उद्या पृथ्वीच्या जवळून जाणार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था : ‘स्टेरॉईड 2023 जेडी 2’ हा पाषाणाचा बसच्या आकाराचा गोळा (अपोलो परिवारातील लघुग्रह) बुधवारी (दि. 17) पृथ्वीच्या जवळून जाईल. पृथ्वीपासून त्याचे अंतर यावेळी 56.3 लाख कि.मी. असेल. त्याचा ताशी वेग 46 हजार 800 कि.मी.हून जास्त असून, या लघुग्रहाची पृथ्वीजवळून पुढची चक्कर 20 मे 2107 रोजी असेल. तेव्हा या लघुग्रहाचे पृथ्वीपासूनचे अंतर 92 लाख कि.मी. असेल.

सूर्याभोवतीच्या परिभ्रमणाचा या लघुग्रहाचा कालावधी 748 दिवसांचा आहे. या कालावधीत सूर्यापासूनचे त्याचे किमान अंतर 14.5 कोटी कि.मी., तर कमाल अंतर 33.7 कि.मी. असते.

लघुग्रह म्हणजे काय?

लघुग्रहांना क्षुद्र ग्रहही म्हणतात. ते सूर्यमालेतील ग्रहांचेच विखुरलेले अवशेष असतात. सूर्यमालेत फिरत असतात.

‘नासा’ का असते मागावर?

‘स्टेरॉईड 2023 जेडी 2’ हा लघुग्रह पृथ्वीसाठी धोकादायक नाही. 250 फुटांचा एखादा लघुग्रह पृथ्वीच्या जवळून गेला, तर तो मात्र संकट ठरू शकतो. ‘नासा’तील (अंतराळ संशोधन संस्था) जेट प्रॉपल्शन लॅबोरेटरी त्यामुळेच या लघुग्रहांच्या मागावर असते.

Back to top button