नाना पटोले म्हणताहेत, “भाजपमध्ये मोठी फूट पडली आहे” | पुढारी

नाना पटोले म्हणताहेत, "भाजपमध्ये मोठी फूट पडली आहे"

मुंबई, पुढारी ऑनलाईन : राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांची भेट नाकारली आहे. भाजपमध्ये मोठी फूट पडली आहे, अशी धक्कादायक माहिती काॅंग्रेसचे नेते नाना पटोले यांनी दिली आहे. मात्र, मुख्यमंत्री मिलिंद नार्वेकर राज्यपालांना भेट घेण्यासाठी राजभवनावर गेले होते. या सर्व पार्श्वभूमीवर राज्य सरकार आणि राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याच वाद पेटणार असल्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे.

या बातमीमुळे राजकीय वर्तुळात संभ्रमाचं वातावरण तयार झालं आहे. पण, राज्यपालांकडून असं सांगण्यात आलं आहे की, अशी भेटीची वेळीच मागण्यात आली नव्हती. काॅंग्रेस नेते नाना पटोले यांच्या या आरोपांमुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. पटोले म्हणाले की, भाजपमध्ये मोठी फूट पडणार आहे. कारण, त्यांचे आमदार फुटण्याची शक्यता आहे”, असंही पटोले यांनी सांगितलं आहे.

नियोजित कार्यक्रमात राज्यपाल व्यस्त होते. तसेच राज्यपालांचा दिवसभराचा कार्यक्रम ठरलेला होता, त्यामुळे कोणत्याही भेटीची वेळ देण्यात आली नव्हती, असंही स्पष्टीकरण राजभवनातून देण्यात आलं आहे. अशा घडामोडी घडत असताना मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहायक मिलिंद नार्वेकर राजभवनावर गेले आहेत आणि विरोध पक्षनेते देवेंद्र फडणवीस राजभवनावर दिसल्यामुळे विविध तर्क-वितर्क काढले जात आहेत.

पहा व्हिडीओ : शिवसेना आणि नारायण राणे यांच्यात नेमका वाद काय 

हे ही वाचा…

Back to top button