राजापूर : मच्छी आणण्यासाठी निघालेला ट्रक कोसळला विहीरीत | पुढारी

राजापूर : मच्छी आणण्यासाठी निघालेला ट्रक कोसळला विहीरीत

राजापूर (जि. रत्‍नागिरी), पुढारी वृत्तसेवा : रत्नागिरीवरुन नाटे येथे मच्छी आणण्यासाठी निघालेल्या ट्रकला अपघात होवून तो बाजूला असलेल्या विहीरीत कोसळता कोसळता बचावल्याची घटना गुरुवारी मध्यरात्री घडली. या अपघातात ट्रकचालक किरकोळ जखमी झाला. या अपघात प्रकरणी नाटे पोलीसांत नोंद झाली नव्हती.

मच्छीवाहु ट्र्क एम एच ०८ ,एपी ३०९३ हा रत्नागिरीयेथुन नाट्याला मच्छी आणण्यासाठी चालला होता . त्या ट्रक मध्ये बर्फ भरलेला होता. गुरुवारी मध्यरात्री अडीचच्या दरम्यान तो ट्र्क कशेळी कोंबे येथे आला असता अचानक चालकाचा ताबा सुटला आणि तो ट्रक रस्त्याच्या बाजूला असलेल्या विहिरीच्या तोंडाजवळ जावून कलंडला. सुदैवाने तो विहीरीत पडता पडता बचावला. मात्र झालेल्या अपघातात ट्रकचे नुकसान झाले असुन चालकाला किरकोळ दुखापत झाली आहे अशी माहिती मिळाली. या प्रकरणी नाटे पोलीसांत नोंद झाली नव्हती.

हे ही वाचलं का 

Back to top button