

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन: सारा अली खान म्हणते, पाप केलं तर वैष्णो देवीला जाऊ शकणार नाही. सारा अली खान हिने खूप कमी कालावधीत लोकप्रियता मिळवली आहे.
अधिक वाचा –
तिने काही तासांपूर्वी एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये तिचं वेगवेगळं रुप पाहायला मिळत आहे. या व्हिडिओमध्ये दिल्ली, बिहार, जयपूर, सांगला, वैष्णो देवी, वाराणसी आणि गोवा प्रवासाची एक झलक दाखवण्यात आली आहे. तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.
अधिक वाचा –
सारा या व्हिडिओमध्ये वैष्णो देवी दरबारी पोहोचलेली दिसत आहे. ती एका व्यक्तीशी बोलताना दिसत आहे.
तो व्यक्ती म्हणतो, असं म्हटलं जातं की, ज्यांनी पाप केलं आहे. ते माता राणीच्या गुहेत प्रवेश करू शकत नाही.
अधिक वाचा –
त्या व्यक्तीचे म्हणणे ऐकून सारा म्हणते, जर मी पाप केलं आहे तर मी दर्शन करू शकणार नाही. मी आत जाऊ शकणार नाही.
साराचा हा व्हिडिओ २९ लाखांहून अधिक वेळा पाहण्यात आला आहे.
हेदेखील वाचलंत का ?