सातारा डबल मर्डर : दुसऱ्या मर्डरचा तपास करताना पहिल्याचा उलगडा
सातारा ; पुढारी वृत्तसेवा : सातारा डबल मर्डर : पत्नीसह अन्य एका महिलेचा खून करुन परागंदा झालेल्या संशयित आरोपीस सातारा पोलिसांनी पकडले आहे. ८ दिवसांपूर्वी महिलेचा खून झाल्यानंतर संशयित आराेपी नितीन गाेळे याला ताब्यात घेण्यात आले.
यावेळी त्याने अडीच वर्षापूर्वी पत्नीचा खून करून तो मृतदेह जंगलात पुरल्याची कबुली दिली. थरकाप उडवून देणाऱ्या या माहितीनंतर सातारा पोलिस कालपासून जंगलात खोदकाम करत आहेत.
नितीन याने अडीच वर्षांपूर्वी पत्नीचा खून करुन तिचा मृतदेह कडेगाव (ता. वाई) येथे पुरला हाेता.
त्याने दुसरा मर्डर १० दिवसांपूर्वी केला. याचा तपास करताना नितीन याने केलेला पहिला मर्डरचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले.
या खुनाच्या घटनेनंतर संशयित पोलिसांना गुंगारा देत होता. अखेर त्याला पकडण्यात पाेलिसांना यश आले आहे.
चार दिवसांपूर्वीच फलटण मध्ये डबल मर्डर झालेला आहे. अशातच आणखी एक सातारा शहरात डबल मर्डरची घटना समोर आली आहे.
हेही वाचलं का?

