

पुढारी ऑनलाईन :
आता रेल्वे प्रवासी जादा ऑनलाईन तिकीट बुक करू शकणार आहेत. रेल्वे पोर्टलच्या आयडीशी (आयआरसीटीसी) आधार लिंक नाही त्या यूजर्सना महिन्याला 12, तर जे लिंक आहेत त्यांना 24 तिकिटे बुक करता येणार आहेत. सातत्याने प्रवास करणार्या प्रवासी आणि कुटुंबांना ही सुविधा फायदेशीर आहे.