‘प्रवीण मसालेवाले’ चे संस्थापक हुकमीचंद चोरडीया यांचे निधन

‘प्रवीण मसालेवाले’ चे संस्थापक हुकमीचंद चोरडीया यांचे निधन

Published on

पुणे : पुढारी वृत्तसेवा

प्रसिद्ध उद्योगपती आणि 'प्रवीण मसालेवाले' या लोकप्रीय कंपनीचे संस्थापक हुकमीचंद सुखलाल चोरडीया यांचे आज (शुक्रवारी) सकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. ते ९२ वर्षांचे होते.

त्यांच्या निधनाने उद्योग जगतातून शोक व्यक्त केला जात आहे. त्यांच्या पार्थिवावर आज सायंकाळी वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

हुकमीचंद चोरडीया यांनी आपल्या पत्नी कमालबाई यांच्या साथीने १९६२ साली 'प्रवीण मसालेवाले' या नावाने कंपनी सुरू केली. छोट्या प्रमाणावर सुरू केलेल्या या कंपनीत सलग चाळीस ते पन्नास वर्ष अथक मेहनत घेत त्यांनी आपल्या या कंपनीला लोकप्रीय 'ब्रँड' बनविले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news