‘पीएमश्री’ योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी; देशातील १४ हजार ५०० शाळांचा होणार कायापालट

‘पीएमश्री’ योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी; देशातील १४ हजार ५०० शाळांचा होणार कायापालट
Published on: 
Updated on: 

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : 'पीएमश्री' योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. आगामी काळात शाळांना आदर्श शाळांच्या स्वरूपात विकसित केले जाणार आहे.

पीएम-श्री शाळांमध्ये शिक्षण प्रदान करण्याची एक आधुनिक, परिवर्तनवादी तसेच समग्र पद्धत असेल. नवीन तंत्रज्ञान, स्मार्ट क्लासरूम, खेळ तसेच इतर बाबींसह आधुनिक पायाभूत सुविधावर लक्ष दिले जाईल, अशी माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली. पीएमश्री योजनेत केंद्रीय विद्यालय तसेच नवोदय विद्यालयांचा समावेश असेल.

रेल्वेच्या जमिनी लीजवर देण्याचा निर्णय…

रेल्वेच्या जमिनी दीर्घकालीन लीजवर देण्याचा निर्णयही या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. 'पीएम गती शक्ती' फ्रेमवर्कच्या अंतर्गत या जमिनींचा वापर केला जाणार आहे. सदर जमिनींवर पुढील पाच वर्षात 300 कार्गो टर्मिनलचा विकास केला जाणार आहे, असे केंद्रीय मंत्री अनुराग ठाकुर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. येत्या तीन महिन्यांत या योजनेची अंमलबजावणी केली जाईल. असेही ते म्‍हणाले.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news