रायगड : रोह्यात विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस | पुढारी

रायगड : रोह्यात विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस

रायगड; पुढारी वृत्तसेवा : बुधवारी (७ सप्टेंबर) रोहा शहरासह ग्रामीण भागात विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला. सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचले असून डोंगरमाथ्यावरील ओढे, नाले तुडुंब भरुन वाहू लागले आहेत. शेतात सर्वत्र पाणी साचल्याने हा पाऊस भातशेतीला चांगला व पोषक असल्याने शेतकरी सुखावला आहे

रोहा अष्टमी शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात बुधवारी दुपार नंतर विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला. गेले आठवडाभर पावसाने विश्रांती घेतल्यामुळे नागरिक उकडयाने हैराण झाले होते. अखेर बुधवारी दुपार पासूनच आकाशात काळे ढग जमा होवु लागले. दुपारी २.४५ च्या सुमारास विजेच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावल्याने हवेत गारवा निर्माण झाल्‍याने उकाड्यापासून हैराण झालेल्‍या  नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

मुसळधार पावसाला सुरूवात झाल्यानंतर तालुक्यासह ग्रामीण भागात खंडीत झालेली वीज ३.४५ च्या सुमारास पूर्ववत झाली. बुधवारी पडलेल्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात सखल भागात पाणी साचले असून डोंगरमाथ्यावरील ओढे, नाले तुडुंब भरुन वाहु लागले आहेत.

हेही वाचा

Back to top button