बेळगाव : किल्ला परिसरात बिबट्या सदृश प्राणी दिसल्याची माहिती चुकीची : वनविभाग | पुढारी

बेळगाव : किल्ला परिसरात बिबट्या सदृश प्राणी दिसल्याची माहिती चुकीची : वनविभाग

बेळगाव: पुढारी वृत्तसेवा: किल्ला येथे बिबट्या सदृश प्राणी दिसल्याने किल्ला येथील प्रवेशद्वार बंद करण्यात आल्याचे वृत्त सोशल मीडियावर प्रसिद्ध झाले. परंतु, ही माहिती चुकीची हाेती. बुधवारी सकाळपासून या ठिकाणी सुरळीत पद्धतीने वाहतूक सुरु होती. त्यामुळे कोणीही घाबरून जावू नये, असे आवाहन वनविभागातर्फे करण्यात आले आहे.

मंगळवारी दुचाकीचा अपघात झाल्याने याठिकाणी दुचाकी व चारचाकी वाहने बंद करण्यात आली होती. परंतु, चुकीच्या वृत्तामुळे किल्ला परिसरात भीतीचे वातावरण पसरले. परंतु हे वृत्त चुकीचे असून नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन वनखात्याने केले आहे.

हेही वाचलंत का ? 

Back to top button