पाॅर्नोग्राफी आणि इरोटीका यामध्ये फरक काय?
पुढारी ऑनलाईन डेस्क : प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा पाॅर्नोग्राफी प्रकरणामुळे चर्चेचा केंद्रस्थानी आहे. त्याच्या प्रकरणामुळे पाॅर्नोग्राफी हा शब्द वारंवार समोर येत आहे. मात्र, कलाविश्वात पाॅर्नोग्राफी आणि इरोटीका या संकल्पना आहे. बऱ्याच वेळेला पाॅर्नोग्राफी म्हणजेच इरोटीका समजलं जातं. पण, तसं नाही. पाॅर्नोग्राफी आणि इरोटीका यामध्ये नेमका फरक काय, ते आपण सविस्तर जाणून घेऊ या…
लुसी फिशर या अमेरिकन चित्रपटविश्वात प्रसिद्ध निर्मात्या म्हणून ओळखल्या जातात. लुसी फिशर यांच्यावर एकेकाळी केवळ महिला आणि नोकरदार माता, यावर भाष्य करणाऱ्या निर्मात्या म्हणून ठपका ठेवण्यात आला होता. लुसी फिशर एकदा म्हणाल्या होत्या की, "इरोटीका (शृंगारिकता) ही मुलायम रेशमासारखी असते. तर, पाॅर्नोग्राफी (अश्लील साहित्य) ही नायलाॅनसारखी असते. इरोटीका ही आमच्यासारख्या मध्यवर्गीय सुशिक्षीत लोकांसाठी असते आणि पाॅर्नोग्राफी हे एकटं पडलेलं, अप्रिय असलेलं आणि अशिक्षित लोकांसाठी असते."
- स्टाॅफनबर्ग : 'या' कमांडरने हिटलरच्या हत्येचं केलं होतं धाडस!
- माचू पिचू : जागतिक आश्चर्य असणाऱ्या 'ढगातल्या शहरा'विषयी माहितीय का?
२०११ मध्ये अमेरिकन क्लिनिकल सायकोलाॅजिस्ट लिऑन फ. सेल्टझर यांनी इरोटीका आणि पाॅर्नोग्राफीचा फरक करणारा लेख लिहिला होता. त्यात म्हंटलंय की, "इरोटीकामध्ये अतिशोक्तीचा केली जाते. अवास्तव वर्णनही त्यात जास्त असतं. पाॅर्नोग्राफीमध्ये केवळ भावनाच उत्तेजित करणं, त्याचबरोबर मानवी शरीराचे सौंदर्यदेखील अधोरेखित केलं जातं."

